हि योगासने आहेत शरीरासाठी फायदेशीर
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आयुर्वेदात योगाला खूप महत्व आहे. दररोज योगा केल्याने शरीराला चागले वळण लागते.योगा केल्याने तणावमुक्ती आणि . ताकद मिळते. तसेच निरोगी शरीर राहण्यासाठी मदत होते. योगामुळे दररोज शांत झोप लागते. योगामुळे चेहऱ्याला नैसर्गिक सौदंर्य लाभते योगाच्या मदतीने चेहऱ्यावरील काळे डाग, पुरळ , फोड यामधून मुक्ती मिळते.
शीर्षासन
शीर्षासन या योगामुळे रक्त प्रवाह उलट्या दिशेने होण्यास मदत होते. पायाकडून डोक्याकडे रक्तप्रवाह होतो. यामुळे त्वचेला तजेला मिळतो. तसेच चेहृयावरील सुरकुत्या नष्ट होण्यास मदत होते.
उत्तानासन
या आसनामध्येही रक्तप्रवाह उलट्या दिशेने होतो. हा सूर्य नमस्कार मधील एक प्रकार असून त्यामुळे शरीर मजबूत आणि लवचिक होण्यास मदत होते.
हलासन
या आसनामध्ये शरीरातील ब्लड सर्क्युलेशन चेहरा आणि डोक्याकडे जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे चेहऱ्यावरील नसांमध्ये जास्त रक्त पुरवठा केला जातो. त्याचा फायदा चेहऱ्याला होऊन चेहरा उजळतो.
सर्वांगासन
या यामध्ये रक्ताचा पुरवठा जास्त होतो. पायाकडून डोक्याकडे रक्तप्रवाह होत असल्याने त्वचा साफ होते. आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या नष्ट होतात.