| | |

शिळी चपाती टाकून देणे मूर्खपणाचे लक्षण; जाणून घ्या कारण

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या संस्कृतीमध्ये अन्नाला पूर्णब्रम्ह म्हटले आहे. याचे कारण असे कि माणसाच्या जीवनातील मूलभूत गरजांमध्ये अन्नाचे प्रथम स्थान आहे. तसेच अन्न हे आपल्या शरीरातील पंच महाभूतांचे संरक्षण करते आणि त्यास चालना देते. अन्नाचे हे विशिष्ट स्थान आपण सारेच मानतो आणि अन्नाची पूजादेखील करतो. जगभरात असे अनेक लोक आहेत जे अन्नाविना रोज एक एक करून आपला प्राण सोडत आहेत. असे असतानादेखील असे अनेक लोक आहेत जे उरलेले आणि शिळे झालेले अन्न फेकून देण्यास प्राधान्य देतात. यात अनेकदा अन्न आणि कृषी संघटनेच्या अहवालानुसार, भारतात दरवर्षी सुमारे ४०% अन्न वाया जाते. यात प्रामुख्याने चपाती शिळी झाल्यास न खाण्याचे प्रमाण अधिक आहे. पण शिळी चपाती खाणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभदायक आहे. मग ऍसिडिटी असो किंवा पोटाच्या समस्या अश्या बऱ्याच आजारांवर शिळी चपाती खाणे फायदेशीर आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शिळ्या चपातीच्या सेवनाचे फायदे सांगणार आहोत.

१) अशक्तपणावर आराम – शिळी चपाती खाल्ल्यामूळे अन्न वाया तर जातच नाही. याशिवाय आरोग्याला अनेक फायदेसुद्धा मिळतात. अशक्तपणा जाणवत असेल तर शिळ्या चपातीच्या सेवनाने अशक्तपणा कमी होतो. यासाठी दुधात कुस्करून चपाती खाणे फायदेशीर ठरते.

२) उच्च रक्तदाबावर नियंत्रण – ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी शिळी चपाती फायदेशीर आहे. यासाठी सकाळळी नाश्त्यात थंड दुधासह शिळी चपाती खा. यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते

३) मधुमेहींसाठी फायदेशीर – डॉक्टर सांगतात, मधुमेहींनी शिळ्या चपातीचा नाश्ता करणे फायदेशीर आहे. कारण रोज सकाळी दुधाबरोबर शिळी चपाती खाल्लाने शरीरातील साखर नियंत्रणात राहते.

४) अॅसिडीटीपासून आराम – गॅस, अॅसिटीटी यासारख्या समस्यांवर त्वरित आराम मिळवायचा असेल तर सकाळच्यावेळी दुधासह शिळ्या चपातीचं सेवन करा. असे केल्यास अॅसिडीटी आणि अपचनाची समस्या नियंत्रणात राहील.

५) व्यायामासाठी फायदेशीर – शिळ्या चपातीत असणारे बॅक्टिरीया शरीर निरोगी ठेवण्यासाठी लाभदायक ठरत असतात. यामुळे नियमित शारीरिक कसरत वा व्यायाम करणार्यांनी शिळ्या चपातीचे सेवन करणे ऊर्जादायी पर्याय आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *