If facial skin is dry ...

चेहऱ्याची त्वचा कोरडी पडतेय? ‘या’ टिप्स वापरुन पहा

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  हिवाळ्याच्या दिवसांत त्वचा हि खूप कोरडी पडत जाते. कोरड्या त्वचेसाठी आपल्याला बाजारात अनेक प्रकारचे प्रॉडक्ट चेहऱ्याला लावण्यासाठी मिळतात. त्या साऱ्या प्रॉडक्ट मध्ये केमिकल चा वापर हा जास्त प्रमाणात केला गेला जातो. त्यामुळे ते आपल्या चेहऱ्यासाठी अजिबात योग्य नाही. थंडीच्या दिवसांत तर चेहरा खूपच कोरडा दिसतो. त्यामुळे चेहऱ्याची स्किन हि निघून जाते. अश्या वेळी घरगुती कोणते उपाय आपण करू शकतो ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

मॉइश्चरायझर लावा —

महिला या उन्हाळा असो किंवा हिवाळा आपण सुदंर आणि छान दिसावे म्हणून प्रत्येकजण हे पार्लर चा वापर करत असतो. पार्लर मध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या ट्रीटमेंट केल्या जातात. त्यासाठी खूप जास्त प्रमाणात खर्च पण करावा लागतॊ. त्यापेक्षा घराच्या घरी सुद्धा आपण आपल्या चेहऱ्याची काळजी हि घेतली गेली जाऊ शकते. अंघोळ करून आल्यानंतर आपला चेहरा हा खूपच कोरडा होतो . अश्या वेळी मॉइश्चरायझर म्हणून ग्लिसरीन आणि शिया बटर सारख्या वस्तू आपण चेहऱ्याला लावू शकतो. त्यामुळे त्वचेला मऊ आणि ओलसर बनण्यास मदत होऊ शकते.

 

सौम्य फेस वॉश आणि साबण —–

आपल्या चेहऱ्याला साफ करण्यासाठी थंड पाण्याचा वापर हा जास्त करा. सतत चेहरा आपला चेहरा पाण्याने धुवा . त्यामुळे चेहरा हा सुदंर तर दिसतोच तसेच त्याच्यावर एक वेगळाच लुक यायला सुरुवात होते. खूप जास्त डार्क सुगंध असलेला फेस वॉश वापरला जाऊ नये. हार्श फेस वॉश किंवा साबण आपल्या चेहऱ्याला वापरला तर मात्र आपल्या चेहऱ्याची नैसर्गिक चमक कमी कमी होत जाते. त्वचा हि कोरडी पडत असेल तर त्यावेळी नैसर्गिक प्रकारचे जेल आणि क्रीम वापरली जावी .

स्क्रब करायला सुरुवात करावी —

आपल्या चेहऱ्याची चमक हि वाढवण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी आपल्या चेहऱ्याला स्क्रब केले गेले पाहिजे . स्क्रब केल्याने आपल्या चेहऱ्यावरची मृत त्वचा हि नष्ट होण्यास मदत होऊ शकते. मृत त्वचा काढून टाकण्यासाठी स्क्रब करणे आवश्यक आहे. जर तुमची त्वचा हि अधिक ड्राय असेल तर आठवड्यातून फक्त एकदाच स्क्रब करा.