ghorane

तोंड उघडे ठेवून घोरण्याच्या समस्या या दूर करण्यासाठीचे उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या आहारात वेगवेगळ्या खारट किंवा तुपट पदार्थांचा समावेश झाला असेल तर त्यावेळी घोरणे हे वाढते,  असे म्हंटले जाते.  एखादा माणूस जर आपल्या जवळ झोपत असेल आणि त्याचा  घोरण्याचा आवाज जर जास्त असेल तर मात्र शेजारच्या व्यक्तीला झोप अजिबात लागत नाही . त्यावेळी दोन दोन उशा घेऊन सुद्धा झोप पूर्ण होत नाही .  आपल्या अशा सवयीनमुळे इतरांना  त्रास   हा होत असेल तर अशा वेळी काय उपाय केले पाहिजेत ते जाणून घेऊया ….

झोपेत असताना घोरणे म्हणजे जीभ, टाळू आणि आतील भाग हा सैल पडत असतो. त्यामुळे झोपेत हवा तोंडात घेताना किंवा तोंडातून बाहेर सोडताना काही प्रमाणात कंपने होतात . त्यामुळे झोप हि पूर्ण होत नाही .  आणि  तोंडातून  आवाज यायला सुरुवात होते .  त्यामुळे कदाचित हवेतील कंपनामुळे प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो. त्यासाठी उपाय म्हणून घरगुती उपायांचा वापर हा करू शकतो.

— घरात असलेले मध आणि पाणी कोमट करून त्याचा वापर हा आपल्या घश्याला करू शकता. जर शक्य असेल रे मध हा दुधाच्या मदतीने घेतला तरी चालू शकते . रात्री झोपताना नेहमी आपल्या पाठीखाली उशी टाकावी . म्हणजे पाठीला जास्त ताण पडणार नाही . मान खाली टाकावी .आणि दोन्ही नाकपुडयात तेल किंवा शतावरी तेल टाकावे म्हणजे घोरण्याच्या समस्या या जास्त वाढणारा नाहीत . शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे नाकपुड्या बंद होतात . त्यामुळे घोरणे वाढते . गळा हा कोरडा पडतो. घोरणे हे थांबण्यासाठी दररोज झोपताना गरम पाणी पिले जावे . पंखा किंवा एसी ची सुद्धा थंड हवा लागत असेल तर मात्र घोरण्याच्या समस्या या वाढू शकतात . त्यामुळे पंखा  हा जास्त वापरू नये.