To eliminate menstruation naturally

नैसर्गिक रित्या मासिक पाळी दूर करण्यासाठी

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन ।  महिलांना मासिक पाळी येत असेल तर मात्र ते आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे. महिलाना ठराविक वयानंतर मासिक पाळी हि येते. मासिक पाळीच्या काळात महिलांना अनेक छोट्या – मोठ्या समस्या या जाणवू लागतात. कधी कधी प्रत्येक महिन्याला होणारा त्रास हा दूर करण्यासाठी महिला वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात . नैसर्गिक रित्या मासिक पाळी दूर करण्यासाठी महिलांनी काय काय उपाय केले पाहिजेत ते जाणून घेऊया …

 

प्रत्येक महिन्याला ठराविक दिवसानंतर येणाऱ्या पाळीच्या कालावधीत नेहमी नियोजन फिस्कटते. कधी कधी बाहेर जाण्याच्या उद्धेशाने महिलानी प्लॅनिंग केलेले असते. तर घरी कधी कधी कार्यंक्रम असेल तर त्यावेळी सुद्धा महिलांना पाळी हि पुढे ढकलावी लागते. जर कधी प्रवास करण्याचा योग आला तर त्या काळात मासिक पाळी येणार असेल तर आपल्या प्रवासाचा सगळा मूड हा निघून जातो. अश्या वेळी मासिक पाळी हि ठराविक दिवस तरी लांबणीवर गेली पाहिजे यासाठी प्रयत्न केले जातात. मासिक पाळी हि जर लेट झाली तर मात्र आपल्याला पोदुखीच्या समस्या या जास्त प्रमाणात जाणवायला सुरुवात होते. पण त्यावर उपचार घेण्यापेक्षा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोळ्या घेण्यापेक्षा त्यावर नैसर्गिक उपचार करणे योग्य राहते.

कडधान्ये —-

कडधान्ये यांच्या साहयाने आपली नैसर्गिक पाळी सुद्धा पुढे ढकलली जाऊ शकते. कडधान्ये याचे मिश्रण हे एकत्र करून ते तळून घ्यावे. आणि ते सारे कडधान्ये हे एका मिक्सर मध्ये वाटून घ्यावे . पाळी येण्याच्या अगोदर हि पावडर हि खाल्ली जावी. कडधान्यातील जास्तीच्या फायबरमुळे पोट दुखणे, डोकेदुखी याच्या समस्या या जास्त जाणवतात .

लिंबाचा रस —-

आहारात लिंबाचे प्रमाण हे योग्य असणे आवश्यक आहे. लिंबामध्ये सायट्रिक तसेच व्हिटॅमिन सी चे प्रमाण योग्य राहण्यास मदत होते. आहारात व्हिटॅमिन सी असेल तर मासिक पाळीच्या समस्या या जास्त प्रमाणात जाणवणार नाहीत.उष्णतेमुळे सुद्धा आपल्याला मासिक पाळीच्या समस्या या जास्त प्रमाणात निर्माण होऊ शकतात.

जिलेटीन —-

जिलेटीन चे पाणी सुद्धा मासिक पाली दूर करण्यासाठी मदत होऊ शकते. पण यांचे पाणी पिल्यानंतर आपले पोट दुखीचा समस्या कदाचित वाढू शकतात. म्हणून जास्त प्रमाणात जिलेटीन चा वापर केला जाऊ नये. नैसर्गिक रीतीने आपल्या महिन्याच्या पाळीला पुढे जाण्यास मदत होऊ शकते.

व्यायाम —

जर दररोज काही प्रमाणात व्यायाम केला तर मात्र आपल्या ला त्रास हा जास्त निर्माण होणार नाही. तसेच मासिक पाळीच्या समस्या सुद्धा जास्त निर्माण होणार नाहीत. शरीरात कमी झालेली ही एनर्जी मासिक पाळी दरम्यान होणारा रक्तस्त्राव, त्रास हा निभावून नेण्यासाठी पुरेशी नसते. त्यावेळी आहाराबरोबर व्यायाम हा सुद्धा आवश्यक आहे.