Tomato Benefits For Skin
| | |

Tomato Benefits For Skin लाल लाल टोमॅटो देतो नैसर्गिक सौंदर्य; कसे..? ते जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सुंदर दिसणे हा तुमचा, आमचा आणि प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे. असे म्हणायचे कारण म्हणजे, सुंदर दिसायला आवडत नाही असे जगात कुणी क्वचितच असेल. पण चुकीची जीवनशैली, शरीरात पाण्याची कमतरता, प्रदूषण, धूळ, माती, अचूक संयोजित आहार, व्यायामाचा अभाव या सर्व गोष्टींमुळे सौंदर्याचे १०० पैकी किमान ९० टक्के नुकसान होते. (Tomato Benefits For Skin)
यात चेहऱ्यावरील त्वचेवर झालेले परिणाम आधी दिसून येतात. यामध्ये प्रामुख्याने त्वचेचा पोत बिघडतो. ज्यामुळे त्वचा खडबडीत, कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. अशावेळी घराघरात उपलब्ध असणारा केवळ एक टोमॅटो गेलेले सौंदर्य परत मिळवण्यासाठी मदत करू शकतो. ते कसे..? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

Tomato

रोजची धावपळ आणि दगदगीची जीवनशैली यामुळे सहसा आपल्याला सौंदर्यविषयक गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. पण यामुळे त्वचेचे खोलवर नुकसान होत जाते. यामुळे त्वचेची एक एक पातळी खराब होत जाते. कालांतराने निस्तेज आणि अनेक समस्यांनी ग्रासलेली त्वचा मोठमोठ्या आजारांना बळी पडते. मग अशावेळी केमिकल ट्रीटमेंट आणि विविध औषधोपचारांच्या सहाय्याने त्वचेची गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. काही ठराविक काळासाठी आपली त्वचा काही अंशी सुधारल्याचे दिसून येते. मात्र कालांतराने पुन्हा जैसे थे अशी परिस्थिती दिसून येते. त्यामुळे कोणत्याही ब्युटी ट्रीटमेंट करण्याआधी आणि औषधोपचार घेण्याआधी नैसर्गिक उपचारांना प्राधान्य द्या, असे तज्ञ सांगतात.

Facepack

नैसर्गिक उपचारांच्या सहाय्याने त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. याचे कारण म्हणजे नैसर्गिक पदार्थांमध्ये कोणत्याही केमिकल रसायनांचा समावेश नसतो. उलट यातील पोषण आणि नैसर्गिक घटक त्वचा असो वा केस यांची गुणवत्ता मुळापासून सुधारण्यास मदत करतात. यामुळे जिथे त्वचेविषयी समस्या वाटत असेल तेव्हा सर्वात आधी तुमच्या घरात सहज आढळणाऱ्या लाल टोमॅटोची मदत घ्या. कोणत्याही महागड्या, वेळखाऊ आणि केमिकलयुक्त्त उपचारांपेक्षा व्हिटॅमिन सी’ने परिपूर्ण असणाऱ्या टोमॅटोचा वापर कधीही बेस्ट. (Tomato Benefits For Skin)

० त्वचेसाठी टोमॅटो फायदेशीर (Tomato Benefits For Skin)

टोमॅटो एक लिंबूवर्गीय फळ आहे. यामध्ये व्हिटामिन सी, व्हिटामिन ए, व्हिटामिन ई आणि व्हिटामिन के मुबलक प्रमाणात आढळतात. याशिवाय टोमॅटोमध्ये पोटॅशिअम आणि मॅगनीज भरपूर प्रमाणात असतात. तसेच यात कॅल्शिअम, आयर्न, कॉपर, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, झिंक यासारखे भरपूर तत्त्व असतात. इतकेच नव्हे तर टोमॅटोमध्ये अँटी ऑक्सिडेंट आणि अँटी एजिंग गुणदेखील मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे त्वचेसाठी टोमॅटोचा वापर केल्यास मोठ्या प्रमाणात फायदा होतो.

टोमॅटोमधील लाल रंग हा त्यातील लाइकोपीन या घटकामुळे प्राप्त झालेला असतो. जो आपल्या आरोग्यासाठी खुपच फायदेशीर आहे. याच कारणामुळे कच्चा टोमॅटो पिकल्यावर अधिक प्रभावशाली भूमिका भूषवितो. याशिवाय टोमॅटोमध्ये कर्बोदकाचे प्रमाण अत्यंत कमी असते. यामुळे केवळ त्वचेसाठी नव्हे तर हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह या विकारांवरदेखील तो मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरतो.

० टोमॅटोचा ‘असा’ करा वापर (Tomato Use For Skin)

त्वचेच्या उत्तम आरोग्यासाठी टोमॅटोचा दैनंदिन आहारात समावेश जरुरीचा आहे. तसेच चेहरा नैसर्गिकरित्या तेजस्वी आणि सुंदर बनवायचा असेल तर यासाठी टोमॅटो फेसपॅक बनवून त्वचेवर लावल्याने अनेक फायदे होतील. कारण त्वचेसाठी पोषक असणारे व्हिटॅमिन सी टोमॅटोमध्ये आहे. याव्यतिरिक्त एस्ट्रिजेंट आणि अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म देखील टोमॅटोमध्ये असतात.

यासाठी टोमॅटोसोबत दुधाचा वापर जास्त फायदेशीर मानला जातो. कारण या दोन्ही पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषण तत्त्वांचा साठा असतो. जो त्वचेचे पीएच लेव्हल संतुलित राखण्यास मदत करतो. मात्र लक्षात ठेवा दूध आणि टोमॅटो यांचे स्वयंपाकामध्ये एकत्रित प्रयोग करून खाऊ नका. असे केल्यास पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

० टोमॅटो फेसपॅक (Tomato Face Pack)

टोमॅटो फेसपॅक बनविण्यासाठी एका वाटीमध्ये ४ ते ५ चमचे दूध घ्या. आता एक टोमॅटो स्वच्छ धुऊन घ्या आणि त्याचे एक स्लाइस कापा. टोमॅटोची साल काढा आणि दुधामध्ये चमच्याच्या मदतीने स्मॅश करीत मिक्स करा. आता हे मिश्रण कापसाच्या मदतीने आपल्या चेहऱ्यावर लावा. साधारण २ ते ३ मिनिटांपर्यंत हे मिश्रण सुकू द्या. यानंतर त्यावरच पुन्हा एकदा मिश्रण लावा. वाटीतील संपूर्ण मिश्रण संपेपर्यंत ही क्रिया करत रहा.

Tomato Face Pack’चा उपयोग करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

१) फेस पॅक लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुऊन घ्या.
२) हा फे पॅक चेहऱ्यावर रात्रभर लावून ठेवा. फेस पॅक सुकल्यानंतर झोपताना कोणत्याही अडचणी निर्माण होत नाहीत. त्यामुळे हा फेस पॅक लावून तुम्ही आरामात झोपू शकता.
३) सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा स्वच्छ धुऊन घ्या आणि कॉटनच्या टॉवेलने चेहरा स्वच्छ पुसून घ्या.
४) सर्वप्रथम चेहऱ्यावर गुलाब पाणी लावा आणि थोड्या वेळाने मॉइश्चराइझरचा वापर करा. हवे असल्यास आपण आपली आवडती क्रीम देखील लावू शकता.
५) आठवड्यातून केवळ दोनवेळा या फेस पॅकचा उपयोग करा.

० टोमॅटोचे सौंदर्यवर्धक फायदे (Tomato Benefits For Skin)

Beautiful Face

१) त्वचेचा पोत सुधारतो – उन्हाळ्यात उष्णतेच्या माऱ्यामुळे किंवा थंडीतील हवामानामुळे त्वचेत बिघाड होतो. आपली त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसू लागते. पण जर त्वचेवर टोमॅटोचा प्रयोग केला तर, त्वचेचा टोन सुधारतो. शिवाय त्वचेतील आद्रता टिकून राहते. ज्यामुळे त्वचेचे पापुद्रे निघत नाहीत. याशिवाय टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. यामुळे त्वचेला उजळपणा प्राप्त होतो.

२) चेहऱ्यावरील एक्ने प्रोन दूर होईल – जर त्वचा तेलकट वा एक्ने प्रोन असेल तर आपण स्किन केअर रूटीनमध्ये टोमॅटोचा समावेश करा. कारण, यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचा केवळ चमकदार बनवत नाही, तर चेहऱ्यावरील चिकटपणा आणि तेलकटपणा देखील कमी करते. विशेष करून तेलकट त्वचा असलेल्या महिलांनी उन्हाळ्याच्या दिवसात टोमॅटोचे सेवन आणि टोमॅटोचा फेसपॅक जरूर वापरावा. यामुळे त्वचा मऊ, मुलायम आणि कोमल राहण्यास मदत होते.

३) मुरुम होतील गायब – टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के यांसारखे त्वचेसाठी आवश्यक असणारे पोषक घटक असतात. हे घटक त्वचेची खोलपर्यंत काळजी घेण्यास मदत करतात. यामुळे त्वचा उजळ आणि तेजस्वी दिसते. याशिवाय चेहऱ्यावर ऍक्ने आणि मुरुमांची समस्या असेल तर टोमॅटो टी ट्री ऑइलमध्ये मिसळून त्वचेवर लावा. असे केल्यास अगदी काहीच दिवसात मुरुमे दूर होतात.

४) टोमॅटोचा सनस्क्रीनसारखा वापर – टोमॅटो हे नैसर्गिक सनस्क्रीन म्हणूनही काम करते. कारण लाइकोपीन हा घटक टोमॅटोमध्ये आढळतो. जो त्वचेला अतिनील प्रकाशाच्या हानिकारक प्रभावापासून सुरक्षित ठेवतो. यासाठी टोमॅटोमध्ये दही मिसळून एक दाटसर असा फेस पॅक बनवून त्वचेवर लावा. यानंतर साधारण १५ मिनिटांनी चेहरा धुवा. तथापि, सामान्य सनस्क्रीनच्या जागी टोमॅटोचा वापर केला जाऊ शकत नाही याची नोंद घ्या. हे फक्त एक पूरक म्हणून कार्य करते. पण यामुळे नक्कीच चेहरा हायड्रेट ठेवण्यासाठी मदत होते.