| | |

तोंडली खा आणि आरोग्याची चिंताच सोडा; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। तोंडलीची भाजी म्हटलं कि अनेक लोक नाक मुरडतात. याचे कारण म्हणजे त्यांना माहीतच नाही कि हि भाजी आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. या भाजीला आयुर्वेदात एक विशेष औषधी म्हणून स्थान आहे. याला आयुर्वेदात बिंबी फळ म्हणून ओळखतात. तोंडली आकाराने अंडाकृती असतात व बोराप्रमाणे दिसतात. साधारण १२ ते ६० मिलिमीटर इतक्या लांबीचे हे फळ भाजी म्हणून खाल्ले जाते. ही भाजी स्वादाला खूप छान असते. मात्र लहान मुलांना ती बऱ्यापैकी आवडत नाही. परंतु या भाजीत आढळणारी पोषकतत्व व खनिज आपल्या तब्येतीसाठी खूप लाभदायक असतात. त्यामुळे मुलांच्या आहारात तोडलीचा समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे. शिवाय तोंडलीमध्ये फायबर, आयर्न, विटामीन बी १, विटामीन बी २, थायमिन, कॅल्शियम, पोटेशियम हे घटक देखील मोठ्या प्रमाणात आढळतात. चला तर जाणून घेऊयात तोंडलीच्या सेवनाने होणारे आरोग्यवर्धक फायदे खालीलप्रमाणे:-

१) मधुमेहावर नियंत्रण – मधुमेहाने त्रस्त असलेल्या लोकांनी तोंडल्याची भाजी जरूर खावी. कारण तोंडली रक्तातील वाढलेली साखर कमी करण्यास मदत करते. पण जर तुमची साखर अगोदरच नियंत्रणात असेल, तर मात्र तोंडली वारंवार खाऊ नये. त्याने तुमची साखर कमी होऊ शकते.

२) किडनीस्टोनमध्ये फायदेशीर – किडनीस्टोनचा आजार असेल तोंडली खाणे फायदेशीर आहे. कारण तोंडलीच्या सेवनामुळे किडनीस्टोन वाढत नाही.

३) चयापचय क्रिया व्यवस्थित राहते – चयापचयाची क्रिया ही खाल्लेलं ऍन पचण्यासाठी गरजेची असते. तज्ञांच्या मते तोंडली शरीरात लाल रक्तपेशी तयार करतात. कारण थायमिन आणि विटामीन बी१ हे ऊर्जा वाढवतात आणि चयापचयाची क्रिया व्यवस्थित होते.

४) पोटाची काळजी – पोटाशी संबंधित कोटण्याही आजारांसाठी तोंडली फायदेशीर आहे. कारण तोडलीत आढळणारे फायबर हे पचनक्रिया सुधारतात. यामुळे गॅस होणे, पिट होणे, अपचन या समस्यांपासून पोटाचे संरक्षण होते. याशिवाय मुळव्याधीसारख्या समस्येपासूनही आराम मिळतो.

५) वजन कमी होते – वजन कमी करायचे असेल, तर तोंडली जरूर खा. कारण यातील फायबर पोट बराचवेळ भरलेले ठेवते. परिणामी अतिरिक्त खाण्याची सवय मोडते आई हळूहळू वजन कमी होऊ लागते.

० लक्षात ठेवा
– जर तुमच्यावर कोणत्याही प्रकारची सर्जरी/शस्त्रक्रिया होणार असेल, तर तोंडली खाऊ नका. यामुळे शरीरातील रक्तशर्करा कमी होते. त्यामुळे खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.