| |

तुळस म्हणजे अंगणातला वैद्य; जाणून घ्या प्रकार आणि फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। तुळशीला ‘हर्ब क्वीन’ किंवा ‘औषधाची राणी’ असे संबोधले जाते. कारण तुळशीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. अनेक रोग बरे करण्यासाठी आणि शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी तुळस खूप प्रभावी आहे. तुळस ही शरीराच्या अंतर्गत आणि बाह्य उपचारासाठी फायदेशीर आहे. तिच्या पानाचं विशेष महत्व म्हणजे, व्यक्तीच्या प्रकृतीनुसार ते काम करते. तुळशीमधील बहुगुणांमुळे फक्त तुळशीची पानंच नाही तर खोड, फूल, बिया या भागांचाही आयुर्वेदमध्ये उपचारांसाठी वापर केला जातो. आज आम्ही तुम्हाला तुळशीचे प्रकार आणि तुळशीचे फायदे सांगणार आहोत.

  • तुळशीचे प्रकार :-

– राम तुळस

– श्याम किंवा श्यामा तुळस

– श्वेत/विष्णू तुळस

– वन तुळस

– लिंबू तुळस

तुळशीच्या या पाचही प्रकारांमध्ये अनेक पोषक तत्त्वं आढळतात. मुळात तुळस याचा शाब्दीक अर्थ म्हणजे ‘अमूल्य रोप’. तुळशीच्या पानांचा प्रभाव आणि फायदे जगभरात मानले जातात. कारण त्यात अनेक प्रकारचे न्यूट्रीशन आणि व्हिटॅमीन्स आढळतात. उदाहरणार्थ; व्हिटॅमीन ए, बी, सी आणि के, कॅल्शियम, आर्यन, क्लोरोफिल, झिंक, ओमेगा- 3, मॅग्नेशिअम, मँगनीज.

  • तुळशीच्या पानांचे फायदे

१) सर्दी व खोकला – ऋतू बदलत्यावेळी अनेकदा आजारपण येते. अश्यावेळी औषध घेऊन ताप कमी होतो पण खोकला आणि कफ बराच काळ राहतो. यासाठी, तुळशीच्या काढ्यासारखा घरगुती उपाय केल्यास आराम मिळतो.

२) कॅन्सर – काही संशोधनानुसार, तुळशीचे बी कॅन्सरवर ईलाजासाठी उपयुक्त असल्याचे समोर आले आहे. खरंतर तुळस अँटी ऑक्सीडंट क्रियेला चालना देऊन कॅन्सरचा ट्यूमर पसरण्यापासून रोखते. असे म्हणतात कि, तुळशीचे पाणी नियमित प्यायल्याने कॅन्सर होण्याची शक्यता खूप कमी होते.

३) किडनी स्टोन – तुळशीच्या प[पानांचे सेवन केल्याने मूत्रविसर्जन सुलभ होते आणि किडनी स्वच्छ राहण्यास मदत होते. यामुळे जर किडनी स्टोन असेल, तर तुळशीचा ताजा रस मधात घालून रोज किमान ४ ते ५ महिने प्यावा. यामुळे मूत्रावाटे किडनी स्टोन पडून जाईल.

४) पोटासंबंधित आजार – पोटातील जळजळ, वेदना, गॅस, ब्लोटींग इत्यादी समस्या दूर करण्यासाठी तुळशीचा वापर करतात. तज्ज्ञांनुसार तुळशीची पान आणि बिया दोन्हीही पोटाच्या अल्सरवर गुणकारी आहेत.

५) तोंडाची दुर्गंधी करतं दूर – तुळस एक प्रकारे नैसर्गिक माऊथ फ्रेशनरचे काम करते. त्यामुळे तोंडातून दुर्गंधी येत असेल, तर तुळशीची काही पान पाण्यात उकळून घ्या आणि मग पाणी थंड करून त्याने चूळ भरा. असे केल्यास तोंडाची दुर्गंधी दूर होईल.

६) ताण तणाव – तुळशीच्या पानांमध्ये अँटीस्ट्रेस एजंट आढळतात. जे आपल्यावरील तणाव आणि मानसिक असंतुलनाला बरं करतात. शिवाय ही पाने तणावामुळे मेंदूवर होणाऱ्या नकारात्मक विचारांना दूर करण्यास मदत करतात.

७) रोग प्रतिकार शक्तीत वाढ – ताजी तुळशीची पान रोज सकाळी गिळल्यास शरीरातीळ रोग प्रतिकार शक्ती चांगली राहते. यामध्ये अनेक असे गुणधर्म आहेत जे शरीरातील इन्फेक्शनशी लढणाऱ्या अँटीबॉडीजच्या उत्पादनात अनेक पटीने वाढ करते, ज्यामुळे आपण कमी आजारी पडतो.

८) स्कीन इन्फेक्शन – तुळशीची पानं अँटी बॅक्टेरिअल असतात. जी बॅक्टेरियाची वाढ रोखतात. यामुळे कोणत्याही प्रकारचे स्कीन इन्फेक्शन असेल तर त्या स्कीन इन्फेक्शनवर बेसनासोबत तुळशीच्या पानांची पेस्ट बनवून लावावी. याचा नक्कीच फायदा होईल.