Cardamom
| | | |

दोन वेलदोडेसुद्धा वाढवू शकतात ऊर्जाशक्ती आणि सौंदर्य; विश्वास बसत नसेल तर लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेक लोकांना त्वचा फिकी पडणे किंवा त्वचेवर भेगा पडण्याच्या समस्या जाणवतात. याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील पाण्याची कमतरता आणि अन्य कारण म्हणजे मेलॅनिनची (त्वचेचा रंगद्रव्य) अधिकता. या दोन्ही समस्यांमूळे सौंदर्यास हानी पोहोचते. मात्र वेलदोडा एक असा पदार्थ आहे जो गोड पदार्थांमध्ये विशेष चवीकरता वापरला जातोच पण त्याचसोबत तो आपले सौंदर्यदेखील उजळवतो. आयुर्वेदानुसार वेलदोडे थंड, तीक्ष्ण, मुखशुद्धीकरण करणारे, ऊर्जावर्धक, पित्त तथा वात नाशक, श्वास, खोकला, मूळव्याध, क्षय, वस्तिरोग, सुज, खाज, मूत्रकृच्छ तथा हृदयरोग यांसाठी लाभदायक आहे. फक्त एवढंच कि आपल्याला वेलदोडे खाण्याची योग्य पद्धत आणि प्रमाण माहित असायला हवे.

मुख्य म्हणजे हिरवा वेलदोडा स्त्रियांसाठी जास्त फायदेशीर आहे. कारण हिरवा वेलदोडा त्यांच्यासाठी दोन प्रकारे आरोग्यवर्धक ठरतो. आपल्या देशातील अनेक स्त्रियांमध्ये लोह कमी आढळते. जवळ जवळ ६० % ते ७० % महिलांमध्ये रक्ताची कमतरता म्हणजेच अॅनीमियाची गंभीर समस्या असल्याची माहिती आहे. ज्या स्त्रियांना हा त्रास जाणवतो त्यांनी २ हिरव्या वेलदोड्याचे नियमित सेवन केले असता त्यांच्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते. शिवाय त्यांच्या चेहऱ्यावर नैसर्गिक तेजसुद्धा येते.

तसेच वेलदोड्यामुळे अत्याधिक महिलांमध्ये आढळणाऱ्या मूड स्विंग्सची समस्या देखील नाहीशी होते आणि मेनोपॉजच्या काळात होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासही मदत होते. तर १ छोटा चमचा हिरव्या वेलदोड्याची बारीक पूड, १ चमचा गहू किंवा १ चमचा तांदुळाची जाडसर पिठी, १ चमचा कोरफडीचा गर, १/२ चमचा मध आणि ३ ते ४ थेंब गुलाबजल असे दिलेल्या प्रमाणात या सर्व गोष्टी एकत्रित करा. हा फेसपॅक ३० ते ४० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून स्वच्छ करा. अश्या पद्धतीने हा फेसपॅक किमान एक आठवडाभर वापरल्याने त्वचा नैसर्गिकरित्या उजळते आणि चेहऱ्यावर तेज येते.

तसे पाहता सर्व सामान्यपणे वेलदोडा भारतातल्या प्रत्येक घराघरात आढळणारा पदार्थ आहे. पुलाव किंवा छोले यांसारख्या पदार्थांमध्ये तसेच खास करून गोड पदार्थांची चव वाढवण्यासाठी वेलदोडा वापरला जातो. इतकेच नव्हे तर चहा किंवा कॉफीसारख्या पेयांमध्येही वेलदोड्याचा वापर सर्रास केला जातो. काही लोक जेवणानंतर मुखशुद्धीसाठी वेलदोडा चावून खातात. यामुळे अनेकदा वेलदोड्याचे सेवन होत असते. जे शारीरिक ऊर्जा वाढीकरिता आवश्यक आहे. वेलदोडा थंड असल्यामुळे शरीरातील अत्याधिक गर्मीचा ऱ्हास होतो आणि शारीरिक ऊर्जा कायम राहते. आपणही वेलदोड्याचा अश्या पद्धतीने वापर करू शकता ज्यामुळे तुमच्या दैनंदिन कार्यास गती येईल आणि त्वचेला नैसर्गिक तेज मिळेल.