| | |

अॅवकाडोसोबत रोझ वॉटर मिसळून फेस पॅक वापराल तर त्वचेच्या समस्या होतील दूर; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अॅवकाडो हे एक फळ आहे. हे फळ आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानले जाते. कारण यामध्ये अनेको पौष्टिक घटक समाविष्ट आहेत. ज्यामध्ये सर्व प्रकारचे महत्त्वपूर्ण जीवनसत्त्व यांचाही समावेश आहे. तसेच या फळामुळे पचन सुधारते, वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवता येते. इतकेच नव्हे तर, आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलदेखील कमी होण्यास मदत होते. या फळाचा गर त्वचेसाठी अत्यंत लाभदायक मानला जातो. त्यात जर सोबत रोझ वॉटरची साथ लाभली तर अधिकच उत्तम.

अॅवकाडोमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे समाविष्ट असतात. ज्यात जीवनसत्त्वे बी, सी, ई आणि के, रिबोफ्लेविन, पॅन्टोथेनिक अॅसिड, मॅग्नेशियम, पोटॅशियम, ल्यूटिन, बीटा-कॅरोटीन, फॅटी अॅसिडस्, अँटी-ऑक्सिडंट्स इत्यादींचा समावेश आहे. यामुळे हे फळ आपल्या त्वचेसाठी फायदेशीर सिद्ध होते. आपण जर अॅवकाडोचा गर रोझ वॉटरसोबत अर्थात गुलाब जलसोबत मिसळून फेस पॅक त्वचेला लावला तर त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात.

० हा फेसपॅक कसा तयार कराल ?
– यासाठी अॅवकाडोचा ४ चमचे गर घ्या. त्यामध्ये फक्त रोझ वॉटर मिसळा आणि याची गुळगुळीत अशी पेस्ट तयार करा. झाला तुमचा फेस पॅक तयार.
हा फेस पॅक आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर किमान ३० – ४० मिनिटे लावा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. या फेस पॅकचा वापर सातत्याने केल्यास चेहऱ्याच्या अनेको समस्या दूर होतील.

० अॅवकाडोचे इतर फायदे :-
– अॅवकाडो फळ कापुन त्यावर थोडे ऑलिव्ह ऑईल, मीठ, मिरचीपूड आणि जिरेपूड घालून खा. हे फळ दररोज खाऊ शकता. यामुळे मेटॅबोलिक सिंड्रोम कमी होतो. शिवाय अॅवकाडो खाणाऱ्यांना ई जीवनसत्त्व, तांबे, मॅग्नेशियम, क जीवनसत्त्व, फोलेट आणि कर्बोदके मिळतात. तसेच अॅवकाडोच्या सेवनाने इन्सुलिन व होमोसिस्टीनचे प्रमाण योग्य राहते. होमोसिस्टीन वाढल्यास हृदयविकार होतो.