| |

दुधी भोपळ्याचा स्क्रब वापरा आणि घरच्या घरी सुंदर त्वचा मिळवा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सुंदर दिसणे ही सर्वांची इच्छा असते. त्यामुळे सुंदर दिसण्यासाठी न जाणे कित्येक विविध उपाय, महागडे प्रोडक्ट्स आणि कसल्या कसल्या थेरेपी करतात. पण याशिवाय अशी अनेक लोक आहेत जी आपल्या त्वचेची काळजी नैसर्गिक रित्या घेणं पसंत करतात. याच कारणही तसच आहे ना. खूप महागड्या औषधांमध्ये अनेको केमिकल्स वापरले जातात. त्यामुळे याचा फरक तात्पुरता अव्वल असला तरी नंतर त्वचा खराब होऊ लागते. पण नैसर्गिक उपायांचा वापर केल्यास त्वचा खराब होत नाही. उलट नैसर्गिक गोष्टी त्वचेसाठी इतक्या फायदेशीर असतात की त्वचेचा उजळपणा आणि टवटवीत पणा दीर्घकाळ टिकून राहतो.

त्यामुळे आजच्या काळात त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक लोक घरगुती उपचारांकडे वळताना दिसत आहेत. इतकेच नव्हे, तर बहुतेक रासायनिक उत्पादनांमध्येसुद्धा आता नैसर्गिक गोष्टींचा वापर केला जातो. त्यामुळे जर तुम्हाला तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचवून आपल्या त्वचेची काळजी घ्यायची असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम उपाय घेऊन आलो आहोत. होय.. तुम्हाला दुधी भोपळा माहित असेल ना? होय. होय. तोच. ज्याचा आपण हलवा, भाजी आणि सांबार साठी वापर करतो. जितका चवीने उत्तम तितकाच त्वचेसाठी दुधी भोपळा फायदेशीर असतो. त्यामुळे जर तुम्हाला नैसर्गिक रित्या त्वचा स्वच्छ करायची असेल तर तुम्ही व्हॅनिला आणि दुधी भोपळ्याचा स्क्रब वापरला पाहिजे. कारण हा स्क्रब मृत त्वचा काढून त्वचेचा उजळ पणा टिकविण्यास मदत करतो.

० दुधी भोपळा त्वचेसाठी फायदेशीर कसा?
– दुधी भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. ही दोन्ही तत्वे त्वचेच्या एक्सफोलिएशनमध्ये मदतयुक्त कार्य करतात. यामुळे त्वचेची लवचिकता वाढते. शिवाय दुधी भोपळ्यात आढळणारे व्हिटॅमिन ए मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत करते. तसेच दुधी भोपळ्यातील व्हिटॅमिन ई त्वचेला चमकदार आणि तेजस्वी बनविण्यास मदत करते. चला तर जाणून घेऊयात व्हॅनिला आणि दुधी भोपळ्याचा फायदेशीर स्क्रब कसा बनवायचा ते खालीलप्रमाणे :-

० लागणारे साहित्य खालीलप्रमाणे
– साखर १ कप
– दुधी भोपळा प्युरी ४ चमचे
– नारळ तेल २ चमचे
– दालचिनी १/४ टीस्पून
– व्हॅनिला अर्क १/२ टीस्पून

० स्क्रब बनविण्याची कृती – एका पातेल्यात खोबरेल तेल गरम करून घ्या आणि गॅस बंद करा. यानंतर त्यात व्हॅनिला अर्क घालून व्यवस्थित मिसळा. पुढे त्यात दुधी भोपळ्याची प्युरी घालून पुन्हा एकदा मिसळून घ्या आणि या प्युरीमध्ये दालचिनी व त्याचसोबत साखर घाला. आता तयार मिश्रण एका भांड्यात काढून ठेवा. झाला तुमचा स्कब तयार..

० याचा वापर कसा कराल?
– हा स्क्रब थंड ठिकाणी साठवून ठेवा. जर हा स्क्रब फ्रिजमध्ये ठेवला असेल तर वापराच्या दोन तास आधी बाहेर काढून ठेवा. म्हणजे त्यातील नारळाचे तेल वितळेल. हा स्क्रब तुम्ही हात आणि पायाला लावू शकता. शिवाय याचा वापर करून तुम्ही मालिश देखील करू शकता.