| |

बेकिंग सोड्याचा वापर करा आणि मिळवा लक्षवेधक सौंदर्य; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। बेकिंग सोडा हा विज्ञानाच्या भाषेत सोडियम बाय कार्बोनेट म्हणून ओळखला जातो. हे सॉलिड क्रिस्टलसारखे असते. परंतु याची बारीक पावडर तयार करून खाण्यायोग्य बनविली जाते आणि बाजारात विकली जाते. पाव, केक, डोसा, इडली, मेदुवडा यासारख्या रुचकर पदार्थांमध्ये बेकिंग सोडा वापरला जातो. यामुळे हे पदार्थ अत्यंत हलके आणि लुसलुशीत होतात. इतकेच नव्हे तर बेकिंग सोडा वापरलेले पदार्थ कमी प्रमाणात खाल्ल्याशी पॉट भरते. परंतु तुम्हाला माहित आहे का? बेकिंग सोडा खाण्यासोबतच केस, त्वचा आणि शरीरासाठीदेखील फायदेशीर आहे. काय सांगताय तुम्हाला नाही माहित? मग माहित करून घ्या लगेच.

१) डाग आणि सुरुकुत्या – चेहर्‍यावरील डाग आणि सुरुकुत्या प्रत्येकालाच नकोश्या असतात. यासाठी बेकिंग सोडामध्ये अँपल व्हिनेगर आणि नारळ तेल मिसळून याची पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर १० मिनिटे लावून ठेवा. यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून किमान ३ वेळा हि कृती केल्यास चेहऱ्यावरील डाग आणि सुरुकुत्या दूर होतील.

२) मुरुम – मुरुमांपासून मुक्त होण्यासाठी १ चमचा बेकिंग सोडा आणि थोडेसे पाणी मिसळून त्याची पेस्ट तयार करा आणि जिथे मुरुम असेल तेथे फक्त १५मिनिटांसाठी लावा. यानंतर पाण्याने हलके धुवा. आठवड्यातून २ वेळा हि कृती केल्यास मुरुमाची समस्या दूर होईल.

३) अंडरआर्म्स – अनेकदा काखेतील केस काढण्यासाठी विविध क्रीम वापरल्याने किंवा ब्लेड वापरल्याने येथील त्वचा काळी पडते. यामुळे स्लिव्हलेस कपडे परिधान करताना लाज वाटते. यासाठी १ चमचा किसलेली काकडी, २ चमचे ऑलिव तेल, १ चमचा बेकिंग सोडा आणि ३ चमचे लिंबू रस व्यवस्थित मिसळा आणि हे मिश्रण आपल्या काखेतील भागावर १० मिनिटांसाठी लावा. यानंतर कोमट पाण्याने धुवा आणि स्वच्छ टॉवेल्सने पुसून टाका. बेकिंग सोडामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतो, ज्यामुळे घाण आणि गंध वाढविणारे बॅक्टेरिया सहज काढून टाकण्यास तो सहाय्यक ठरतो.

४) केसांसाठी – केसांसंबंधित कोणत्याही समस्या दूर कारण्यासाठी बेकिंग सोडा पाण्यात भिजवून आपल्या केसांना लावा आणि १० मिनिटांनंतर केस धुवा. हि कृती आठवड्यातून २ वेळा केल्याने केस कोरडे होतील आणि लांबसडक देखील होतील. याशिवाय केसांच्या टाळूवर बेकिंग सोडामध्ये एरंडेल तेल मिसळून लावल्यास केस अधिक लांब आणि घनदाट होतील.

५) काळ्या ओठांसाठी – कोणत्याही कारणांमुळे ओठ काळे पडले असतील तर १ चमचा मध आणि १ चमचा बेकिंग सोडा मिसळून पेस्ट तयार करा आणि हि ओठांवर लावा. पुढे २-३ मिनिटांनी बोटाच्या सहाय्याने ओठांना हळूवारपणे मसाज करा आणि ओठ स्वच्छ करा. आठवड्यातून किमान २-३ वेळा ही क्रिया केल्यास ओठांचा काळेपणा दूर करेल.

६) दात चमकणे – दातांची व्यवस्थित निगा न राखल्यामुळे दात पिवळे पडतात आणि किडतात. यावर उपाय म्हणून थोडा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात थोडेसे पाणी मिसळून ५ मिनिटे दातांवर ठेवा. एक आठवडाभर २ दिवसाआड हि क्रिया केल्यास पिवळे दात साफ होतील.