Use egg oil for hair

अंडयांच्या तेलाचा केसांसाठी करा वापर

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । केस जर लांब आणि काळेभोर असतील तर तुमच्या केसांमुळे तुमच्या सौदर्यात हा खूप फरक पडायला मदत होते . चांगल्या सौदर्यासाठी आपले केस मजबूत आणि दात असले पाहिजेत त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या तेलाचा सुद्धा वापर केला असेल . नारळाचे तेल ,बदामाचे तेल, अनेक वेगवेगळ्या प्रकारची तेले हि केसांसाठी वापरली गेली असतील पण अंडयांचे तेल हे कधी वापरले गेले नसेल तर… जाणून घेऊया कश्या पद्धतीने त्या तेलाचा वापर हा आपल्या केसांसाठी केला जाऊ शकतो ते जाणून घेऊया ….

 

अंड्याचे तेल तुमच्या केसांसाठी खूपच उपयुक्त आहे. अंड्यांच्या तेलात नारळाचे तेल, बदामाचे तेल, ऑलिव्ह ऑईल यांचाही समावेश असल्यामुळे ते तुमच्या केसांसाठी एक बहुगुणी औषध ठरू शकते. शिवाय या तेलात अंड्याचे प्रोटिन्स असल्यामुळे तुमच्या केसांच्या अनेक समस्या कमी होतात. यासाठीच घरच्या घरी हे हेअर टॉनिक तयार करा आणि केसांच्या समस्या दूर करा. यासाठी जाणून घ्या अंड्याचे तेल कसे तयार करावे, कसे वापरावे आणि त्याचे फायदे काय काय आहेत.

 

अंड्याचे तेल कसे तयार करतात–

 

अंड्याचे तेल बनवण्यासाठी अंड्याचा पिवळा बलक वेगळा करावा आणि त्यात तुमच्या आवडीची तेल मिसळावी. पंरतु इतर तेल मिसळताना त्याचे प्रमाण हे योग्य असणे गरजचे आहे. अंड्याचा हा पिवळा बलक केसांसाठी फायदेशीर ठरतो. यात कोलेस्ट्रॉल, फॉस्फोलिपीडस, ट्रायग्लिसराईड भरपूर असतात. यातील ओमेगा-3, ओमेगा-6 फॅटि ऍसिड मिळते. त्यामुळे कोंडा होण्याचे प्रमाण हे कमी असते. केस आणि स्काल्प निरोगी होतो. बाजारात विविध प्रकारचे अंड्याचे हेअर ऑईल विकत मिळते. अंड्याचे तेल घरी तयार करण्यासाठी दोन ते तीन उकडलेला अंड्याचा पिवळा बलक घ्या. तो शिजवून त्यापासून तेल काढून घ्या. त्यामध्ये चमचाभर नारळाचे तेल, एक चमचा बदामाचे तेल, एक चमचा ऑलिव्ह तेल मिसळा आणि एकजीव करा. हे तेल तुम्ही तुमच्या केसांसाठी नियमित वापरू शकता.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *