| |

बडीशेपचा फेसपॅक वापरा आणि चेहऱ्यावरचे डाग कायमचे विसरा; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सुंदर दिसायला कुणाला आवडत नाही? तुम्हाला नाही का आवडत? मग तुम्ही सुंदर दिसण्यासाठी काय करता? आता तुमच्यापैकी अनेकजण सांगतील आम्ही तर बुआ पार्लरमध्ये महागड्या ट्रीटमेंट घेतो. तर काहीजण सांगतील आम्ही तर घरीच महागडी सौंदर्य प्रसाधने आणतो आणि घरच्या घरी सौंदर्य मिळवतो. तर उरलेले बाकीचे सांगतील आम्ही तर काहीच करत नाही कारण आम्ही नॅचरल ब्युटी आहोत. असे वेगवेगळ्या विचारांच्या लोकांच्या सौंदर्याची व्याख्या वेगळी असते. पण काही म्हणा, कितीही नाही म्हटलं तरी सुंदर दिसायला तुम्हालाही आवडतंच ना.. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी १००% सौंदर्याची हमी देणारी अगदी सोप्पा असा घरगुती उपाय घेऊन आलो आहोत.

अनेकदा आपण धूळ, माती , प्रदूषण आणि शारीरिक अस्वछता यामुळे आपल्या त्वचेची काळजी घेण्यास असमर्थ ठरतो. अश्यावेळी महागड्या ब्युटी ट्रीटमेंट्स केल्या तर तात्पुरता प्रभाव आणि पुन्हा त्वचेचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येते. म्हणून अश्यावेळी प्रामुख्याने लोक घरगुती उपायांचा वापर करणे ठरवतात. यासाठी आम्ही तुम्हाला एक असा फेसपॅक सांगणार आहोत. जो तुमचा वेळीही वाचवेल आणि तुमचं सौंदर्याची काळजीसुद्धा घेईल.

आज आपण बडिशेपचा मास्क कसा करायचा आणि आणि त्याचा वापर कसा करायचा हे जाणून घेणार आहोत. आश्चर्य वाटायचं अजिबात कारण नाही. बडीशेप म्हणजे तुम्ही समजतंय ना तीच. मुखवास म्हणून वापरली जाणारी बडीशेप सौंदर्याची पक्की साथीदार आहे. कारण यामध्ये आयर्न, कॉपर, जिंक आणि कॅल्शियम असतं. जे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. यामुळे चेहऱ्यावरील मुरूमं, खराब झालेली त्वचा, काळे डाग आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी मदत होते. चला तर जाणून घेऊयात बडीशेपचा फेसपॅक कसा बनवायचा आणि त्याचे फायदे काय ते खालीलप्रमाणे:-

० बडीशेपचा फेसपॅक बनविण्यासाठी लागणारे साहित्य:-
– १ मोठा चमचा बडिशेप
– २ मोठे चमचे ओट्स
– १/२ कप उकळवलेले पाणी

कृती – सर्वप्रथम गरम पाण्यात बडिशेप आणि ओट्स भिजवा. याचे व्यवस्थित मिश्रण तयार करा आणि चेहऱ्याला लावा. साआता १/२ तास हा फेसपॅक असाच राहूद्या. यानंतर गार पाण्याने चेहरा धुवा. या फेसपॅकचा वापर आठवड्यातून किमान एकदा जरूर करा.

फायदे

१) चेहरा आतून स्वच्छ होण्यास मदत होते. परिणामी चेहरा सतेज होतो.

२) चेहऱ्याचे पोर्स खुले होऊन छिद्रांमधील घाण उत्सर्जित होते.

३) चेहऱ्याला नैसर्गिक चमक मिळते.

४) मुरूम आणि मुरुमांच्या डागांवर नियंत्रण मिळवता येते.

५) डेड स्किन काढून टाकण्यासाठी मदत होते.

६) ब्लॅकहेड्सची समस्या दूर होते.

७) चेहऱ्यावर येणाऱ्या अकाली सुरकुत्यांवर फायदा होतो.