rose jel
|

सुगंधित गुलाबाच्या तेलाचा असा करा वापर

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  आपल्या आजूबाजूला आपण नेहमी गुलाब लावतॊ, कारण त्याचा सुगंध वास हा आपल्याला मिळाला पाहिजे. तसेच गुलाबाच्या फुलाचे सौदर्य हे इतर फुलांपेक्षा कीतीतरी पटीने अधिक असते. गुलाब हा दिसायला खूप सुदंर असतो. त्यामुळे त्याचा वापर हा सौदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी सुद्धा केला जातो. गुलाबाच्या पाकळ्यांपासून आपल्या शरीराला लावले जाणारे तेल सुद्धा आपण तयार करू शकतो. त्या तेलाचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात ….

गुलाबाच्या पाकळ्या पासून तयार केलेलं तेल हे अँटी एजेटिंग असे आहे. त्याचा वापर हा आपल्या चेहऱ्याच्या सौदर्यासाठी सुद्धा केला जातो. त्याने खूप सुंदर पद्धतीने आपले सौदर्य वाढण्यास मदत होते. अनेक ठिकाणी सजावटीसाठी सुद्धा गुलाबाच्या पाकळ्या आणि फुलाचा वापर हा केला जातो. गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर हा अंघोळीसाठी सुद्धा केला जातो. गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार केलेले तेल सुद्धा खूप महत्वाचे आहे. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी गुलाबाचे फुल महत्वाचे आहे.

चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो —-

गुलाबाच्या तेलात असलेले अँटिसेप्टिक आणि अँटी ऑक्सिडंट असे गुणधर्म आहेत. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या या कमी होण्यास मदत होते. नियमितपणे आपल्या चेहऱ्याची मसाज जर आपण गुलाबाच्या तेलाने केली तर मात्र आपला चेहरा हा चिरतरूण होण्यास मदत होऊ शकते. गुलाबाच्या तेलाने तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येण्यास मदत होऊ शकते. तुमची त्वचा स्वच्छ राहते आणि त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो. हे तुमच्या त्वचेतील छिद्रांमध्ये जमा होणारी धुळ, माती, प्रदूषण कमी करते त्यामुळे त्वचेचे पोअर्स बंद होत नाहीत. जर नियमित गुलाबाच्या तेलाने त्वचेला मालिश केलं तर त्वचेवर चांगला ग्लो निर्माण होतो.

पिंपल्स होतात कमी कमी —-

चेहऱ्यावर निर्माण होणारे पिंपल्स ही एक मोठी डोकेदुखीच असते. त्वचेच्या छिद्रांमध्ये धुळ, माती, प्रदूषण अडकून राहिल्यामुळे चेहऱ्यावर अतिरिक्त तेलाचा साठा होतो आणि इनफेक्शनमुळे पिंपल्स निर्माण होतात. अचानक चेहऱ्यावर येणारे हे पिंपल्स तुमच्या सौंदर्यामध्ये नक्कीच बाधा आणतात. मात्र गुलाब तेलाचा वापर केल्यामुळे हे चेहऱ्यावर पिंपल्स येणं नक्कीच कमी करता येऊ शकतं. गुलाबपाणी पिंपल्समुळे येणारे डागही कमी करतं. त्यामुळे जर तुम्हाला नितळ आणि चमकदार त्चचा हवी असेल तर त्वचेवर गुलाबपाण्याचा वापर जरूर करा.

मुलतानी माती —-

तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर सौदर्य मिळवण्यासाठी ज्यावेळी मुलतानी माती लावता त्यावेळी तुमच्या चेहऱ्यासाठी काही प्रमाणात गुलाब पाण्याचा सुद्धा वापर हा केला जावा. गुलाब पाणी हे चेहऱ्याला मऊ आणि मुलायम बनवण्यास मदत करते.

त्वचा मऊ होते —- 

मऊ आणि मुलायम सिल्कप्रमाणे त्वचा कोणाला नाही आवडत. मात्र अती प्रदूषण आणि सतत सौंदर्य प्रसाधने वापरण्यामुळे त्वचेचं नुकसान होऊन त्वचेचा मऊपणा कमी होत जातो. गुलाबाचं तेल तुमच्या त्वचेला नैसर्गिक पद्धतीने मऊ करतं. हिवाळ्यात त्वचेला येणारा कोरडेपणा कमी करण्यासाठी गुलाबाचं तेल वापरणं एक चांगला पर्याय आहे.