| | |

फ्रोजन अन्नपदार्थ रोजच्या आहारात वापरताय..?; मग या गोष्टींची काळजी घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल पुरुष काय आणि महिला काय..? सारेच आपल्या दगादगीच्या आयुष्यात इतके व्यग्र आहेत, कि कुणालाही आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याकरिता वेळच नाही. आधी महिला केवळ संसारात अडकलेल्या होत्या. मात्र आता महिला देखील पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून समाजात आपली ओळख निर्माण करण्यासाठी घराबाहेर पडल्या आहेत. यामुळे अनेकदा त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी लागणारा वेळ असेलच याची शाश्वती नसते. त्यामुळे अनेकदा झटपट स्वयंपाक आवरण्यासाठी आपल्याकडून फ्रोजन अन्न पदार्थांचा वापर केला जातो. या अन्न पदार्थांचा वापर करणे अयोग्य आहे असे नाही. मात्र काही विशेष गोष्टींची काळजी घेणे मात्र आवश्यक आहे. तर चला जाणून घेऊयात हि काळजी का व कशी घ्यायची आहे.

अ. फ्रोजन अन्न पदार्थांमुळे आरोग्यावर होणारे घटक परिणाम:

१) फ्रोजन फूड अधिक काळ टिकावे म्हणून त्यामध्ये प्रिझर्वेटिव्हचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या प्रिझर्वेटिव्हमूळे अस्थमाचा त्रास असणाऱ्या लोकांसाठी समस्या उदभवते. कारण त्यांची इम्यून पावर हे अन्नपदार्थ ग्रहण करण्यास सक्षम नसतात.

२) हे पदार्थ कायम ताजे व आहेत तसे दिसण्यासाठी त्यामध्ये स्टार्चचा वापर केला जातो. शिवाय हे फूड बराच काळ टिकावे याकरिता त्यात ग्लुकोजचा व स्टार्चपासून बनविलेल्या कॉर्न सिरपचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. यामुळे मधुमेह प्रकार २’ ने ग्रसित लोकांसाठी हे पदार्थ हानिकारक असते.

३) शिवाय फ्रोजन फूड्स मध्ये सोडिअम मोठ्या प्रमाणात असल्याने आरोग्यविषयक इतर अनेक आजारांचे निमंत्रण दिले जाते. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत होते.

४) फ्रोजन फूड मध्ये असणाऱ्या ट्रान्स फॅटमुळे रक्तवाहिन्यांच्या समस्या निर्माण होतात. यामुळे शरीरातील प्रत्येक भागापर्यंत रक्त पोहोचणे कठीण होते. शिवाय ट्रान्समुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढते आणि हार्ट अटॅकचा धोका संभवतो.

५) फ्रोजन अन्न पदार्थांमधील सर्वाधिक मागणी असणाऱ्या फ्रोजन मिटमूळे स्वादुपिंडाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. शिवाय यात फॅट्सचे प्रमाण अधिक असल्याने कार्बोहायड्रेट किंवा प्रोटीनपेक्षा कॅलरीजचे प्रमाण दुप्पट असल्याने आपले वजन वेगाने वाढते

 

ब. फ्रोजन अन्न पदार्थ वापरतेवेळी घ्यावयाची काळजी :

१) फ्रोजन पदार्थ वापरण्याआधी डीफ्रॉस्ट करा – कोणताही फ्रोजन अन्नपदार्थ आधी डीफ्रॉस्ट करा. त्यावर साठलेला बर्फ पूर्णपणे वितळू द्या. यामुळे स्वयंपाकात लागणारा वेळ कमी लागेल व पदार्थातील सत्व मरण पावणार नाहीत.

२) फ्रोजन पदार्थ लगेच मायक्रोवेव्हमध्ये ठेऊ नका किंवा गरम पाण्यात उकळवू नका- कोणत्याही फ्रोजन पदार्थावरील बर्फ लगेच वितळवून तो पदार्थ वापरण्याची घाई करून त्याला गरम पाण्यात उकळण्यासाठी ठेवणे किंवा मायक्रोवेव्हमध्ये ठेवणे योग्य नाही. यामुळे तो पदार्थ खराब होण्याची शक्यता असते. तो पदार्थ वापरण्यापूर्वी सामान्य तापमानात येण्याकरिता बाजूला ठेवा व त्यानंतर वापरण्यास घ्या.

३) जास्त काळ साठवून ठेवू नका – फ्रोजन पदार्थ अधिक काळ टिकतो म्हणून त्याचा जास्त काळ मोठ्या प्रमाणात साथ करून ठेवू नका. फ्रोजनपदार्थ कोरडे असतात. बर्फामुळे त्यावर ओलावा राहत असला तरी त्यावर वापरले जाणारे प्रिझर्वेटिव्ह त्या पदार्थातील सत्व हळूहळू नष्ट करतात. त्यामुळे फ्रोजन पदार्थ एक किंवा दोन आठवड्यातच वापरात आणा.