| |

शहाळ्याचे पाणी देई केसातील कोंड्यापासून सुटका; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। हिवाळ्याचा हंगाम सुरु झाला कि केसांच्या समस्येत वाढ होते. यात सगळ्यात प्रभावी समस्या म्हणजे कोंडा. केसांत कोंडा झाल्यामुळे सतत स्कॅल्पला खाज येणे, केस चिकट होणे, केस कोरडे आणि निस्तेज दिसणे आणि अजून बऱ्याच समस्या जाणवतात. त्यामुळे कोंड्यावर वेळीच रोख लावणे गरजेचे असते. पण ऋतू बदलला म्हणून केसांच्या रुटीन केअर मधले प्रोडक्ट्स बदलणे अनेकांना शक्य होत नाही. शिवाय अचानक प्रोडक्टस बदलल्यामुळे केसांचे नुकसानदेखील होऊ शकते. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी नैसर्गिक प्रोडक्ट घेऊन आलो आहोत. जे फार महागसुद्धा नाही आणि वेळखाऊ तर नाहीच नाही. या प्रोडक्टचे नाव आहे शहाळ्याचे पाणी.

हिवाळ्यात केसांची विशेष काळजी घ्यायला शहाळ्याचे पाणी हा एकदम बेस्ट उपाय आहे. एकतर हा उपाय नैसर्गिक असल्यामुळे याचा कोणताही साईड इफेक्ट नाही आणि काही झालाच तर फक्त फायदाच होईल. कारण शहाळ्याच्या पाण्यामुळे केसांमधील त्वचा हायड्रेट राहते. परिणामी कोंडा वाढत नाही. या पाण्यामध्ये संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर असे घटक असतात. अमिनो अॅसिड, व्हिटॅमिन्स, अॅंटि ऑक्सिडंट, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि झिंक हे सर्व पोषक घटक शहाळ्याच्या पाण्यात असतात. या सर्व घटकांची शरीराचे कार्य तर उत्तम राहतेच. शिवाय यांचा केसांनाही फायदा होतो. जाणून घेऊयात खालीलप्रमाणे:-

१) शहाळे नारळ पाण्याने नियमित स्कॅल्प वॉश केला किंवा केसांच्या मुळांना मसाज केला स्कॅल्पची त्वचा निरोगी राहते.

२) शहाळ्याच्या पाण्याने केस धुतल्यामुळे त्वचेमधील लवचिकता वाढून केस मजबूत होतात. यामुळे केस गळणे कमी होते.

३) केसांत कोंडा झाल्यामुळे स्कॅल्पला खाज येत असेल तर नारळ पाण्यामुळे स्कॅल्प हायड्रेट राहण्यास मदत होईल आणि खाज येणं कमी होईल.

४) शहाळ्याच्या पाण्याचा वापर केल्यामुळे काही दिवसांतच केसांची वाढ चांगली होते. परिणामी केस गळणेही कमी होते आणि केस लवकर पांढरेसुद्धा होत नाहीत.

५) शहाळ्याच्या पाण्यात थोडा लिंबाचा रस मिसळून केसांना लावल्याने केसांना चांगले कंडिशनर मिळते. परिणामी केस मऊ आणि चमकदार होतात.