Use lotus oil for dry skin

कोरड्या त्वचेसाठी वापरा कमळाचे तेल

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  हिवाळ्याच्या दिवसांत आपल्या त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे असते. या दिवसांमध्ये आपली त्वचा हि कोरडी होऊन त्याच्यावर सुरकुत्या पडायला सुरुवात होते. त्वचा कोरडी पडल्याने चेहऱ्यावरच्या स्किन चा वरचा भाग हा निघालेला जाणवतो. त्यामुळे चेहरा हा खूप  फुटला जातो  असेही त्याला मराठीमध्ये म्हंटले जाते. त्यासाठी हिवाळ्याच्या दिवसांत आपल्या चेहऱ्यासाठी वेगवेगळ्या क्रीम चा पण वापर केला पाहिजे. पण त्यासाठी नैसर्गिक पद्धतीने आपल्या जवळ असणाऱ्या कमळाचा कसा वापर हा केला जाऊ शकतो ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात …

 

हिवाळ्यात केसांप्रमाणेच तुमची त्वचाही कोरडी आणि निस्तेज होते. कमळाच्या तेलाचा वापर केसांप्रमाणेच त्वचेवरही करता येतो. नियमित कमळाचे तेल त्वचेवर लावल्यामुळे त्वचेचा डलपणा कमी होतो आणि टवटवीतपणा दिसू लागतो. या तेलामुळे तुमच्या त्वचेला आतून पोषण मिळते. त्वचा हायड्रेट राहिल्यामुळे त्वचेचा कोरडेपणा हळू हळू कमी होत जातो. ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. सुरकुत्यांमुळे तुम्ही वयाआधीच वयस्कर दिसू लागता. मात्र या तेलामुळे तुमचे सौंदर्य चिरतरूण टिकण्यास मदत होते.

कमळाचा वापर करताना —

— त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी तुम्ही कमळतेलाचा फेसपॅकप्रमाणे वापर करू शकता . त्यासाठी दुधात काही प्रमाणात तेल मिसळा आणि आपल्या चेहऱ्यावर फेस मास्क या पद्धतीने लावा. ही पेस्ट तुमच्या चेहरा आणि मानेवर एकसमान लावा आणि काही मिनिटांनी चेहरा धुवून टाका. चेहरा धुताना थंड पाण्याचा वापर हा केला गेला पाहिजे.

—- तांदळाचे पीठ तयार करून सुद्धा त्याच्यामध्ये कमळाच्या तेलाचा वापर फेसमास्क तयार करू शकता. यासाठी दोन चमचे तांदळाचे पीठ आणि एक चमचा कमळाचे तेल एकत्र करा. चेहरा आणि मानेवर हा मास्क लावा .अर्धा तासाने कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. त्याच्या तुमच्या चेहऱ्यावर उत्तम पद्धतीने प्रभाव हा पडू शकतो.