| | |

कडक उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून कांद्याचा ‘असा’ करा वापर; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून हळूहळू उन्हाचा कडाका वाढताना दिसतोय. त्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे. यासाठी सगळ्यात जास्त मदत करतो तो म्हणजे तुमच्या रोजच्या वापरातील कांदा. होय कांदा. उन्हाळ्यात हिटस्ट्रोक म्हणजेच उष्माघाताचा त्रास होऊ नये, यासाठी कांदा उपयुक्त ठरतो. पण कसा..? हे अनेकांना माहित नाही. म्हणून आज आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देणार आहोत.

बरेच लोक कच्चा कांदा खाणे टाळतात कारण तो खाल्ल्याने तोंडाला दुर्गंधी येते. पण उन्हाळ्यात मात्र काेशिंबीर किंवा सॅलडच्या माध्यमातून थोडा का होईना कच्चा कांदा आवर्जून खा. शिवाय उन्हाळ्याच्या दिवसांत कांद्याचा रस त्वचेसाठी आणि शरीरासाठी लाभदायी ठरतो. त्यामुळे यंदाचा उन्हाळा सुसह्य करायचा असेल तर कांदा तर हवाच. चला तर जाणून घेऊया ऊन बाधू नये म्हणून कांद्याचा काय आणि कसा वापर करायचा ते खालीलप्रमाणे:-

1. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून कच्च्या कांद्याचा रस काढून तो मस्तकावर लावा. यामुळे डाेकं शांत, थंड होतं आणि ऊन लागल्याने होणारा त्रास कमी होतो.
2. उन्हाचा त्रास होऊ लागला आणि मळमळ वा उलटीसारखे वाटल्यास कांदा फोडून त्याचा वास घ्या. आराम मिळेल.

3. कांद्यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता अर्थात डिहायड्रेशन टाळण्यासाठी कच्चा कांदा खा.
4. कांदा प्रवृत्तीने थंड असतो. त्यामुळे ज्या लोकांना दररोज उन्हात जावे लागते, त्यांनी उन्हाळ्यात दरराेज रात्री झोपताना तळपायला कांद्याचा रस लावा.

5. उन्हाळ्यामध्ये रक्तदाब कमी होण्याचा त्रास जाणवल्यास नियमितपणे कच्चा कांदा खा. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण संतुलित राहते.
6. उन्ह्यात फिरल्याने त्वचेची जळजळ होत असेल तर हा त्रास थांबविण्यासाठी अंगाला कांद्याचा रस लावावा आणि अर्ध्या तासाने आंघोळ करा. बर वाटेल.