Wednesday, January 4, 2023

लांबसडक केसांसाठी शिकेकाईचा करा वापर

आवडल्यास नक्की शेअर करा

हॅलो आरोग्य  ऑनलाईन ।  महिलांचे केस हे लांब असतील तर ते अजून सुंदर दिसायला सुरुवात होतात. त्यामुळे आपल्या केसांची काळजी घेणे महिलांना गरज असते. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी शिकेकाईचा वापर हा केला जातो. शिकेकाईचा वापर हा आपल्या केसांसाठी जास्त वापर करू शकतो. शिकेकाईचा उपयोग करण्याच्या पद्धती जाणून घेण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे शिकेकाई ही आपल्या केसांच्या आरोग्यासाठी इतर केमिकल शाम्पू पेक्षा केव्हाही चांगला पर्याय आहे.

शिकेकाई आणि रिठ्याच्या वापर—-

केस धुण्यासाठी शिकेकाईचा वापर कसा करावा. पाहिल्या काळात केस धुण्यासाठी शिकेकाईचा वापर केला जात पहिल्या काळातील स्त्रियांची केस हे लांबसडक आणि जाड असायचे. केस धुताना शिकेकाई हि करण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे बाजारात मिळणारी तयार शिकेकाईची पावडर तुम्ही वापरत असलेल्या शाम्पूमध्ये मिसळायची आणि तो शाम्पू दर वेळेला केस धुताना वापर. किंवा शिकेकाईच्या शेंगा आणून त्याची पावडर घ्या.शिकेकाईची पावडर घरी करायची असल्यास शिकेकाईच्या शेंगा विकत आणून त्या साधारण ४ दिवस उन्हात वाळवून घ्यायच्या आणि घरच्या मिक्सरवर त्याची बारीक पावडर करून घ्यायची. अनेक ठिकाणी बाजारात शिकेकाईचा साबण तयार केलेला मिळतो.

—- शिकेकाईचा शाम्पू कसा तयार करायचा.

रात्री झोपण्यापूर्वी शिकेकाईच्या शेंगा, रिठा आणि आवळ्याची भिजत ठेऊन सकाळी ते पाणी चांगले उकळून घ्यायचे. तुम्हाला हवे असेल तर त्यात कडुलिंबाची पाने, मेथी बियांची पूड सुद्धा घालू शकता. व्यवस्थित उकळून थंड झालेले पाणी नीट मिक्स करून, गाळून घ्यायचे. गाळलेले जे पाणी उरेल, ते पाणी तुम्ही आपल्या केसांच्या वाढीसाठी करू शकता. त्याचा फेस पॅक सुद्धा आपल्या तो केसांना आणि डोक्याला व्यवस्थित लाऊन, नेहमीप्रमाणे केस धुवून घ्यायचे.

—– शिकेकाईचे तेल

चमचाभर शिकेकाई पावडर अर्ध्या वाटी तेलात घालून मिक्स करून घ्यायची. हे तेल बरणीत भरून २ ते ३ आठवडे मुरु द्यायचे. मधूनच बरणी हलवून आतील मिश्रण मिक्स करून घ्यायचे. आठवड्यानंतर आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केस धुण्यापूर्वी या तेलाचा वापर केला जाऊ शकतो. हे तेल नियमितपणे केसांना लावल्यास केसांची वाढ सुधारते.

—- शिकेकाईचा हेयर पॅक

तुमच्या केसांच्या प्रकृतीनुसार शिकेकाईचे वेगवेगळे हेयर पॅक केले जाऊ शकतात. काहींचे केस खूपच रुक्ष असतात, काहींचे सारखे तेलकट दिसतात. तुम्हाला जो हेयर पॅक सूट होईल तो तुम्ही घरच्याघरी तयार करून तुमचे केस निरोगी आणि सुंदर करू शकता.

—- कोरड्या, रुक्ष केसांसाठी

केस जर कोरडे आणि रुक्ष असतील तर शिकेकाई आणि दही हे केसांना आवश्यक ते पोषण देतात. हा पॅक करण्याची कृती सुद्धा अगदी सोपी आहे. एका वाटी दह्यात साधारण दोन चमचे शिकेकाई घालून व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची. ही पेस्ट केसांना, मुळापासून २० मिनिटे लाऊन ठेवायची आणि नंतर धुवून घ्यायची. कोरड्या केसांसाठी शिकेकाईचा अजून एका प्रकारे पॅक करता येतो. अर्धी वाटी शिकेकाई आणि एक चमचा आवळ्याची पावडर कोमट पाण्यात २ तासांसाठी भिजवून ठेवायची. हे मिश्रण केसांना लाऊन ठेवायचे. अर्ध्या तासानंतर केस धुवून टाकायचे.

—- तेलकट केसांसाठी

तेलकट केस असतील तर ते स्वच्छ ठेवणे जिकरीचे काम असते कारण केसांच्या मुळाशी तेल साचून तिथे धुळीचे कण अडकून बसतात. यामुळे केसांची वाढ सुद्धा योग्य पद्धतीने होत नाही. यासाठी २ चमचे शिकेकाई पावडर, १ चमचा हिरवे मुग वाटून केलेली पावडर आणि एक चमचा मेथी दाण्याची पावडर हे एका अंड्याच्या फक्त पांढऱ्या भागाबरोबर फेटून घ्यायचे. केस धुताना या पॅकचा वापर शाम्पू सारखा करायचा. यामुळे केस व्यवस्थित स्वच्छ होऊन केसांचा तेलकटपणा जाईल.

—- कोंड्यासाठी

कोंडा हा सगळ्या स्त्रियांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे.कोंडा घालवायला शिकेकाई पावडर, कडुलिंबाच्या पाल्याची पावडर, मेथी दाण्याची पूड आणि आवळा पावडर हे समप्रमाणात घ्यायचे. ते पाणी कमीत कमी २० मिनिटे उकळून घ्या.


आवडल्यास नक्की शेअर करा

हे तुम्ही वाचायलाच हवे...