| |

चेहऱ्यासाठी रताळ्याचा फेसपॅक वापरालं तर म्हातारपणातही तरुण दिसालं; जाणून घ्या साहित्य आणि कृती

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आता वय वाढतंय म्हटल्यावर वयानुसार आपली त्वचासुद्धा म्हातारी होत असते. आता त्वचा म्हातारी होणे म्हणजे काय? तर वाढत्या वयानुसार त्वचेवर सुरकुत्या येतात. फ्रीकल्ससारख्या समस्या उद्भवतात. यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य हळूहळू विरताना दिसून येते. आता आपले सौंदर्य अबाधित ठेवायचे असेल तर यासाठी महिला काहीही करू शकतात यात काही वादच नाही. मग काय महिला बर्‍याच सौंदर्य उत्पादनांचा किंवा उपचाराचा अवलंब करतात. पण यामुळे त्वचेच्या सौंदर्यात काही भर पडत नाहीच शिवाय याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे जर तुम्हाला सुंदर आणि नितळ त्वचेचे धनी होऊन राहायचे असेल तर आम्ही तुम्हाला एक उत्तम आणि सोप्पा असा घरगुती उपाय सांगणार आहोत. हा उपाय म्हणजे रताळ्याचा फेसपॅक. या फेस पॅकने पिग्मेन्टेशन, फ्रिकल्स या वृद्धत्व विरोधी समस्या कमी होतात आणि आपली त्वचा डागांपासून मुक्त होते पण हा फेस पॅक बनवायचा कसा असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्या प्रश्नच उत्तर आम्ही तुम्हाला देऊ. एक नव्हे तर दोन फेसपॅक बनविण्याची सोप्पी कृती जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

रताळी आणि जायफळ

० साहित्य –
रताळी – १/२ चमचा (उकडलेले)
जायफळ पावडर – ४ चमचे
गुलाबाचे पाणी – २ थेंब

० कृती – जायफळ पूड रताळ्यात टाकून मिश्रण तयार करा. आता गरजेनुसार यात गुलाब पाणी घाला. तयार फेस पॅक १५ मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. कोरडे झाल्यावर चेहरा पाण्याने स्वच्छ करा. आठवड्यात १ ते २ वेळा हा फेस पॅक वापरल्यास मुरुम आणि काळ्या डागापासून आराम मिळेल.

रताळी आणि बदाम तेल

० साहित्य –
रताळी – १ चमचा (उकडलेले)
हळद – ४ चमचे
बदाम तेल – २ थेंब

० कृती – सर्वप्रथम रताळी, हळद आणि बदाम तेलाचे थेंब घाला चांगले मिसळा. हे मिश्रण तयार करण्यासाठी मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आता तयार फेस मास्क चेहरा आणि मानेवर १५ मिनिटे लावा. नंतर हलक्या हाताने मालिश करा आणि चेहरा पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा असे केल्यास चेहरा उजळेल आणि सुरकुत्या डाग देखील निघून जातील.