ice on face pack

सुंदरतेसाठी महागडे प्रॉडक्ट्स वापरण्यापेक्षा ‘हे’ करा घरगुती उपाय

हॅलो आरोग्य  ऑनलाईन ।  आपल्याला सुंदर दिसायचे असल्यास अनेक वेळा आपण बाहेरच्या वस्तू वापरतो. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स यायला सुरुवात होते. त्यामुळे अश्या वेळी तुम्ही बाहेरच्या वस्तू वापरण्याऐवजी घरातल्या वस्तू आयुर्वेदीक पद्धतीने वापरल्या तर मात्र आपल्या त्वचेला त्याचे फायदे होतात. घरगुती उपायांमध्ये काही प्रमाणात तुम्ही घरातल्या वस्तूंसाठी केला जाऊ शकतो.

केळीचा मुखवटा —-

आपण जर ताणतणावाला सामोरे जावे लागत असेल तर त्याच्यावेळी आपण केळीचा मुखवटा वापर करू शकता. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरच्या पिंपल्स कमी होऊ शकतात. तसेच जर आपली स्किन उजळवायची असेल तर त्यासाठी आपण केळीचा मुखवटा वापरावा . त्यासाठी कच्चा केळीचा वापर हा आपल्या चेहऱ्यासाठी केला जाऊ शकतो.

चेहऱ्यासाठी लावा उटणे ——

आपल्या चेहऱ्यासाठी सकाळच्या वेळेत जरी उटणे लावले तरी सुद्धा आपला चेहरा हा उजळू शकतो. काही प्रमाणात हरभरा पीठ टाकून आणि हळद टाका त्याच्यामध्ये गुलाब पाणी आणि दही टाकून त्याचा वापर हा आपण आपल्या चेहऱ्यावर करू शकता. हा अँटी बॅक्टरील असलेले मिश्रण आहे. त्याचा वापर हा आपल्या चेहऱ्यावर करू शकता .

दालचिनी मुखवटा —–

जर आपल्याला दालचिनी पावडर मध्ये काही प्रमाणात मध टाकून त्याचा वापर हा आपल्या चेहऱ्यासाठी केला जाऊ शकतो. तसेच त्याच्यामध्ये काही प्रमाणात लिंबू टाकले तरी ते आपल्या चेहऱ्याला लाभकारक आहे.

हळद आणि चंदन मुखवटा —-

आपल्या चेहऱ्याच्या उजळते साठी आपण काही काही प्रमाणात हळद आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणात चंदन मिक्स करून तो मुखवटा आपण आपल्या चेहऱ्याला लावू शकता. हळदीमध्ये अँटीबॅक्टरील आणि अँटी इंफ्लामेंटरी गुणधर्म असतात. चंदन पावडर हि आपल्या त्वचेला थंड करण्याचे काम करते. त्याच्यामध्ये असलेले गुलाबपाणी हे आपल्या चेहऱ्यावर खूप प्रभावी काम करते.

बर्फाने करा मालिश —

आपल्या चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी करण्यासाठी काही प्रमाणात दररोज सकाळ आणि संध्याकाळ थंड बर्फाने मालिश केले तरी चालू शकते. त्वचेवरील रक्ताभिसरण क्रिया हि व्यवस्थित राहण्यासाठी आपल्या चेहऱ्यावर बर्फाने मालिश करा. त्यामुळे आपल्या त्वचेवरील मुरुमांचा त्रास हा सुद्धा कमी कमी होत जातो.