read

वाचलेले काहीच लक्षात राहत नाही तर या टिप्स चा करा वापर

हॅलो आरोग्य ऑनलाईन । अनेक वेळा आपण जे काही वाचतो ते लक्षातच राहत नाही . हि समस्या लहान मुलांबरोबर मोठ्या लोकांना सुद्धा असतात. अनेकांच्या स्मरणशक्तीचा हा प्रॉब्लेम असू शकतो. पण जर तुम्ही नेहमी एकच गोष्ट वाचून सुद्धा तुमच्या लक्षात काहीच राहत नसेल तर आपल्या वाचण्याच्या पद्धती बदलल्या गेल्या पाहिजेत . नियमित पणे आपल्या स्मरणशक्तीवर काम केले पाहिजेत .

अनेक वेळा लहान मुलांच्या बाबतीत या समस्या खूप जास्त प्रमाणात जाणवतात. त्यावेळी लहान मुलांसाठी किंवा त्यांच्या अभ्यासासाठी पोषक वातावरण तयार करणे गरजेचे असते . त्यासाठी काही प्रमाणात कोणत्या प्रकारच्या क्लुप्त्या वापरू शकता ते जाणून घेऊया …

— कोणतेही गोष्ट पाठ केल्यानंतर लगेच विसरत असाल तर त्यावेळी मात्र पाठांतर केल्यावर लिहून बघा- ही शिकवण आपल्याला आपले वडीलधारी देतात. या मागील कारण असे आहे आपण जेवढे आपल्या ज्ञानेंद्रियांना चालना देतो ते आपल्यावर प्रभाव पाडतात.पाठांतर करून लिहून बघितल्याने अवयव सक्रिय होतात, म्हणून लिहून ठेवलेले दीर्घ काळ लक्षात राहत.

— सकाळी वाचन करा.  सकाळी शांतता असते, या मुळे मेंदू सहजपणे गोष्टींना ग्राह्य करतो. म्हणून सकाळच्या वेळी अभ्यास केल्याने चांगल्या प्रकारे लक्षात राहते. एकाग्रता देखील राहते. म्हणून विद्यार्थ्यांनी सकाळी लवकर उठून अभ्यास करावा.

— अनेक वेळा आजी आजोबांकडून ऐकले गेले असेल कि, सकाळची सवय हि अभ्यासासाठी अनुकूल असते . तसेच पहाटे च्या वेळी आजूबाजूचे वातावरण हे शांत असते . त्यामुळे अभ्यासाठी सुद्धा ते सकाळची वेळ योग्य असते .

— एक-एक करून विषय हाताळा- एकत्ररित्या वाचणे कधीही चांगले नाही. सर्व विषय आपण एकत्र वाचू शकत नाही. या मुळे गोंधळाल आणि वाचलेलं लक्षात राहणार नाही. म्हणून एका वेळी एकच विषय वाचावे.