| | |

किचनमध्ये कीटकांचा त्रास असेल तर या टिप्स जरूर वापरा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या घरातील किचन हे एक असे ठिकाण आहे ज्याचा आपल्या घातली प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याशी संबंध असतो. त्यामुळे किचन स्वच्छ आणि किटकमुक्त असणे अत्यंत गरजेचे असते. पण बऱ्याचवेळा आपल्या दुर्लक्ष करण्यामुळे आणि अस्वच्छतेमुळे झुरळं, किडे, मुंग्या, चिलटं असे कीटक या ठिकाणी वावरताना दिसतात.

मुख्य म्हणजे पावसाळ्यात या कीटकांचा वापर जास्त दिसून येतो. कारण पावसाळ्यात ओलावा जास्त असल्यामुळे कीटकांना वाढीसाठी उत्तेजन मिळते. हे कीटक किचनमध्ये वापरल्याने आहारातील शुद्धी आणि सकसतावर प्रश्नचिन्ह उभे राहते. परिणामी आरोग्याशी संबंधित समस्या वाढीस लागतात. त्यामुळे तुमच्याही किचमध्ये हे कीटक तुमच्या आरोग्याशी खेळत असतील तर हा लेख जरूर वाचा. चला तर जाणून घेऊयात किटकमुक्त किचनसाठी करावयाचे उपाय जे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) यांच्यामार्फत कार्यालयांच्या कँटीनसाठी सांगण्यात आले आहेत. खालीलप्रमाणे :-

१) किचनमध्ये जिथून कीटक शिरकाव करतात त्या भागाची अधिक स्वच्छता वा दुरुस्ती करा. हे किटक कुठून येत आहेत ते पाहून तेथील खड्डा किंवा छिद्र सील करा.

२) किचनमध्ये घरातील पाळीव प्राण्यांना घेऊन जाऊ नका.

३) किचनमध्ये कोणताही अन्नपदार्थ मोकळा, उघडा जाणीव भिंतीशेजारी ठेवू नका. अन्न बंद डब्यात ठेवा. त्या डब्ब्याचा वरील, बाहेरील भाग स्वच्छ असेल याची काळजी घ्या.

४) स्वयंपाकघरात जेथे किडे दिसतील तिथे त्वरित नष्ट करा. यासाठी कीटकनाशक औषधे किंवा गोळ्या वापरा.

५) दररोज डिटर्जंट आणि साबणाने किचन स्वच्छ करा. किचनमध्ये वापरले जाणारे टॉवेल देखील नियमित स्वच्छ करा.

६) अन्न शिजवताना स्वच्छ पाण्याचा वापर करा.

७) अन्न शिजवण्यासाठी वापरली जाणारी भांडी साबणाने आणि गरम पाण्याने स्वच्छ करून घ्या.

८) धुतलेल्या भाज्या ओल्या उघड्यावर ठेवू नका. अन्यथा त्यावर चिलटं जमा होतील आणि त्या खराब होण्याची शक्यता आहे.