eyes

आपले डोळे नेहमीच तजेलदार राहण्यासाठी या टिप्स चा करा वापर

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपले डोळे हा सुदंर असतील तर त्यामुळे आपल्या सौदर्यात खूप फरक पडतो. आपल्या डोळ्यांच्या साह्याने आपण आजूबाजूचे सारे पाहू शकतो. त्यामुळे डोळयांच्या समस्या जर सुरु झाल्या तर मात्र आपल्या दिसणे फ़ार अवघड होऊन जाते. आजकाल लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत सगळ्यांचे काम हे लॅपटॉप आणि मोबाइल वर सुरु झाले आहे. त्यामुळे बराच वेळ मुलांचा वेळ हा स्क्रीन वर जातो. त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम जाणवायला सुरुवात होते.

डोळ्याच्या आरोग्यावर होणारे परिणाम —-

आजकाल लोकांच्या राहणीमानात आणि त्यांच्या खाण्या – पिण्याच्या सवयी मध्ये खूप फरक झालेला आहे. आजूबाजूचे वातावरण हे दूषित असल्याने त्याचा काही प्रमाणात प्रभाव हा आपल्या आरोग्यावर झालेला दिसून येतो. आजकाल कोरोनामुळे लोकांच्या आरोग्यावर खूप विपरीत बदल झालेला आढळून येत आहे. सगळ्या लोकांचे जीवन हे कॉम्पुटर आणि मोबाइल च झाले आहे. मोबाइल वर गेम खेळणे आणि रात्रीचे जास्त वेळ जागरण करणे यामुळे खूप जास्त त्रास हा डोळ्यांना होतो. त्यासाठी आहार हा योग्य असणे गरजेचे आहे. आहारात पोषक घटकांचा समावेश असणे गरजेचे आहे.

आपले डोळे हे मजबुत राहण्यासाठी आहारात बदाम, अक्रोड, शेंगदाणे,सूर्यफुलाचे बियाणं जास्त प्रमाणात वापरण्यात आणले पाहिजे. कारण या मध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन इ आढळते. जे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे.व्हिटॅमिन इ च्या कमतरतेमुळे डोळ्यांची दृष्टी कमकुवत होते. हिरव्या पालेभाज्या या आपल्या डोळ्यांसाठी फार आवश्यक आहे. हिरव्या पालेभाज्यांमध्ये आयरन आणि व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात आढळते.जे डोळ्यांची दृष्टी वाढविण्यात आणि डोळ्यांना निरोगी ठेवण्यात मदत करते. गाजर हे डोळ्यांसाठी खूप महत्वाचे मानले जाते. गाजराचा ज्यूस हा लाभकारक तर आहेच तसेच डोळयांच्या दृष्टीस सुद्धा उपयोगी आहे. जे लोक मांसाहारी नाहीत त्यांनी आपल्या आहारात सोयाबीन च्या भाजीचा आहारात वापर केला तर चालू शकतो.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *