| |

स्वस्त दरातील ‘या’ चायनीज वस्तू वापरणे आरोग्यास पडेल महागात; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। निश्चितच आपण कमवत असलेले पैसे वाचविण्यासाठी आपण शक्य तितके धडपडतो. मग पर्याय म्हणून शक्य तितक्या कमी दरातील स्वस्त वस्तू आपण रोजच्या वापरासाठी विकत घेतो. या एकमेव कारणासाठी अनेको चायनीज वस्तू बाजारात मोठया प्रमाणात अगदीच स्वस्त दरात उपलब्ध आहेत. कमी किंमत आणि दिसायला आकर्षक म्हणून या वस्तू अनेक लोकांमध्ये प्रिय आहेत. स्वस्त माल मस्त अश्या तत्त्वावर चालणारे आपण कधीच हा विचार का करत नाही कि आपण वापरात असलेली कमी दरातील आकर्षक वस्तू खर्च उपयुक्त आहे का ? याशिवाय त्याची निर्मिती करण्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल कोणत्या स्वरूपाचा असतो ? केवळ स्वस्त आहे म्हणून आपण वापरात असलेल्या वस्तूंचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो?

१) चायनीझ खेळणी – The New York Times’च्या अहवालानुसार, अमेरिकेमध्ये २४ प्रकारच्या खेळण्यांमध्ये घातक घटक वापरले जात असल्याने पुन्हा मागवण्यात आले होते. याचे कारण असे कि, चायनीज खेळण्यांमध्ये वापरले जाणारे रंग लहान मुलांच्या शरीरात गेल्यास त्यांच्या मेंदूच्या विकासावर गंभीर परिणाम होत असल्याचे आढळून आले होते. याशिवाय खेळण्यांमध्ये वापरले जाणारे प्लास्टिक देखील तोंडात गेल्याने पोटाच्या आतड्यांचे नुकसान होऊ शकते.

२) सौंदर्य प्रसाधने – महिला आपल्या रोजच्या वापरात आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी कित्येक सौंदर्य प्रसाधने वापरत असतात. यात प्रामुख्याने बॉडी लोशन, लिप्सटिक, पावडर यांचा समावेश असतो. परंतु हि उत्पादने अत्यंत महागडी असल्यामुळे महिला पर्यायी उत्पादनांचा अवलंब करतात. पर्यायी अर्थात स्वस्त आणि किफायती दरात मिळणारे चायनीझ कॉस्मॅटिक्स प्रोडक्ट्स अनेको महिला पसंतीने घेतात. मात्र या प्रोडक्ट्समध्ये प्रामुख्याने पारा,आर्सेनिक, लीड (शिसं) यासारखे घातक घटक समाविष्ट असतात. ज्यामुळे आपल्या त्वचेला हानी पोहचते.

३) शुगर कॅण्डीज – शुगर कॅंडीज या लहान मुलांना अति आकर्षित करतात. त्यांचा रंग आणि रॅपर दोन्ही दिसायला इतके लक्षवेधी असते कि मुलं तेच पाहिजे म्हणून हट्ट करतात. याला पर्याय म्हणून चायनीज शुगर कॅण्डीज बाजारात जास्त प्रमाणात उपलब्ध आहेत. जे केवळ सुदृढ शरीराद्वारे अंशतः पचवले जाऊ शकतात. कारण ह्या कॅंडीज नियमित कॅंडीज पेक्षा प्रति ग्रॅम कमी कॅलरी प्रदान करतात. तथापि, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल साइड इफेक्ट्स होण्याची शक्यता असते. शिवाय, पोटात गोळा येणे, गॅस आणि अतिसार या समस्या देखील होतात.

४) आईस्क्रिम कोन रॅपर – वैज्ञानिकांनी एप्रिल २०१२ साली केलेल्या एका प्रयोगाच्या निकषानुसार चायनीज उत्पादनांपैकी आईस्क्रिम कोन रॅपर्सच्या उत्पादनात प्लॅस्टिक पॅकेजिंग करताना घातक मेटलचा समावेश करण्यात येतो. यामुळे कॅन्सर होण्याचा धोका दहा पटीने वाढतो.

५) चायनीझ टुथपेस्ट – तज्ञांनी २००७ साली एका चायनीझ टुथपेस्टची FDA द्वारा चाचणी केली असता त्यांना यात घातक घटक आढळून आले होते. ज्यात Diethylene Glycol या अत्यंत घातक पदार्थाचा समावेश होता. हा पदार्थ मानवी शरीरासाठी अत्यंत हानिकारक असल्याचे अनेको संशोधनात आढळून आले आहे.

० अत्यंत महत्वाचे – आता तुमच्यातील काहीजण म्हणतील, कि या वस्तू चायनीज आहेत म्हणून आक्षेपार्ह माहिती दिली जात आहे. तर हे असे नसून वृत्त माध्यमांच्या अहवालानुसार हि माहिती प्रसिद्ध केली जात आहे. शिवाय काही संशोधकांच्या संशोधनातूनही या वस्तू आरोग्यासाठी घातक असल्याचे सिद्ध झाले आहे. कळावे..