Vegan Diet Benefits
| |

Vegan Diet Benefits – भाग 2 : व्हेगन डाएटचे प्रकार किती व कोणते..?; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। (Vegan Diet Benefits) व्हेगन डाएट सर्वसामान्य डाएटप्रमाणे केले जाणारे डाएट असले तरीही यामध्ये दूध, अंडी, मांस या पदार्थांचा समावेश नसतो. व्हेगन डाएट म्हणजे शाकाहारी पदार्थांचे सेवन करून वजन कमी करणे. याआधी आपण भाग १ मध्ये व्हेगन डाएट म्हणजे काय..? त्याचा शरीराला कसा उपयोग होतो..? आणि मुख्य म्हणजे हे डाएट कसं करतात..? या प्रमुख तीन प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली. यानंतर आता आज भाग २ मध्ये आपण व्हेगन डाएटचे प्रकार किती आणि कोणते..? यासह व्हेगन डाएटचे मानवी आरोग्याला फायदे काय..? हे जाणून घेणार आहोत.

० व्हेगन डाएटचे प्रकार किती आणि कोणते…?

मित्रांनो, व्हेगन डाएटचे एकूण ३ प्रकार आहेत. हे तीनही डाएट विविध व्यक्तीरचनेसाठी फायदेशीर आहेत. यापैकी एक म्हणजे व्होल फूड व्हेगन डाएट. दोन रॉ फूड व्हेगन डाएट आणि तीन स्टार्च सोल्युशन व्हेगन डाएट. या तिन्ही प्रकारांविषयी जाणून घेऊ खालीलप्रमाणे:-

Vegan Diet Benefits
Vegan Diet

प्रकार 1

व्होल फूड व्हेगन डाएट (संपूर्ण शाकाहार) – (Vegan Diet Benefits) या डाएटच्या प्रकारात आपण नियमित खात असलेल्या आहारामध्ये धान्य, फळे, भाज्या, नट आणि विविध प्रकारच्या बियांचा समावेश होतो. हा आपला दिवसभरातील संपूर्ण आहार असू शकतो. या व्यतिरिक्त आपल्या खाण्यापिण्यात अन्य कोणत्याही पदार्थांचा समावेश केला जात नाही.

प्रकार 2

रॉ फूड व्हेगन डाएट – या डाएटच्या प्रकारात आपल्या दिवसभरातील संपूर्ण आहारात केवळ कच्च्या अन्नाचा समावेश होतो. यामध्ये कच्च्या अन्नाचा आहार म्हणजेच फळे, कच्च्या भाज्या, नट, बिया इत्यादी पदार्थ.

Vegan Diet

प्रकार 3

स्टार्च सोल्यूशन व्हेगन डाएट – (Vegan Diet Benefits) या डाएटच्या प्रकारामध्ये स्टार्चयुक्त पदार्थांचा समावेश आहे. कारण स्टार्च आहारामध्ये अत्यंत कमी चरबीयुक्त आणि उच्च कार्बनयुक्त शाकाहारी खाद्य पदार्थांचा समावेश असतो. ज्यामध्ये कोणत्याही फळांऐवजी बटाटे, तांदूळ आणि कॉर्न यांचा जास्त वापर केला जातो.

० व्हेगन डाएटचे मानवी आरोग्यासाठीचे फायदे

(Vegan Diet Benefits)

१) डिटॉक्सिफिकेशनसाठी मदत होते –

Detox Water

व्हेगन डाएटमध्ये आपल्या आहारात खूप लहान सहान बदल होतात. ज्यामुळे शरीराला फायदा होतो. या आहारामध्ये प्रोटीन आणि लोह या दोन घटकांचे भरपूर प्रमाण समाविष्ट असल्यामुळे शारीरिक आरोग्यासाठी हे डाएट फायदेशीर भूमिका बजावते. या डाएटमुळे शरीरातील उर्जेची पातळी नेहमी उच्च राहते आणि थकवा जाणवत नाही. शिवाय या आहारातील हे घटक शरीर डिटॉक्स करण्यासाठी मदत करते.

२) हृदय निरोगी राहते –

Heart Care

(Vegan Diet Benefits) व्हेगन डाएट नियमित त्याच्या नियमानुसार फॉलो केल्यामुळे आपले हृदय निरोगी राखण्यास मदत होते. तज्ञांनी केलेल्या एका अभ्यासानुसार, व्हेगन डाएट फॉलो करण्यामुळे हाय ब्लड प्रेशरचा धोका साधारण ७५% कमी होतो. ज्यामुळे हृदय रोग वा हृदय विकाराचा झटका येणे अशा समस्यांची शक्यता किमान ४२% पर्यंत कमी होते. यामुळे हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी व्हेगन डाएट कधीही फायदेशीरच म्हणावे लागेल.

३) ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते –

high BP

व्हेगन डाएटमध्ये आपण खात असलेल्या पदार्थांमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. (Vegan Diet Benefits) शिवाय या आहारात अशा कोणत्याही पदार्थाचा समावेश नसतो ज्यामुळे शरीरात रक्तातील साखरेची पातळी वाढेल. परिणामी ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.

४) नैराश्याची समस्या दूर राहते –

Stressfree

व्हेगन डाएटमध्ये शाकाहारी पदार्थांचा समावेश असल्यामुळे या आहारात विविध फळे, विविध भाज्या आणि काजूचे सेवन भरपूर प्रमाणात केले जाते. या पदार्थांमधून आपल्या शरीराला अँटी ऑक्सिडंट्स आणि ओमेगा ३ चे मुबलक प्रमाण मिळत असते. त्यामुळे व्हेगन डाएटचे पालन करणाऱ्या व्यक्ती नैराश्य, ताण, तणाव आणि चिंता अशा मानसिक समस्यांपासून दूर राहतात.

५) वजन वेगाने कमी होते –

Weight Loss

व्हेगन डाएट हा सेलिब्रिटींमधील लोकप्रिय डाएटचा प्रकार आहे. याचे कारण म्हणजे वजन वेगाने कमी करण्यासाठी हा आहार सर्वोत्तम असल्याचे आहार तज्ञ देखील सांगतात. (Vegan Diet Benefits) व्हेगन डाएटमध्ये आपण खात असलेल्या पदार्थांमधून शरीराला कॅलरीज तर मिळतात पण त्यामध्ये फॅट जमा होत नाही. म्हणूनच निरोगी पद्धतीने वजन कमी करण्यासाठी व्हेगन डाएट प्रभावी मानला जातो.

६) इतर आरोग्यविषयक फायदे –

व्हेगन डाएट केल्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर रोगाचा धोका कमी होऊ शकतो. शिवाय अशा रोगांवर मात करण्यासाठी देखील व्हेगन डाएट फायदेशीर आहे.

व्हेगन डाएटमध्ये खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये खुप प्रकारचे व्हिटॅमिन, मिनरल आणि न्युट्रीएंट्स शरीराला मिळतात. ज्यामुळे आपल्या शरीराला विविध आरोग्यविषयक फायदे होतात. (Vegan Diet Benefits)

० व्हेगन डाएट करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

मित्रांनो कोणतीही गोष्ट करताना त्याचे नियम पाळणे आवश्यक आहे. अन्यथा ती गोष्ट फायद्यांऐवजी दुष्परिणाम देऊ शकते. तसेच डाएट फॉलो करताना काही गोष्टींची प्रामुख्याने काळजी घेणे गरजेचे असते. (Vegan Diet Benefits) जसे कि,

Eating

१. व्हेगन डाएट फॉलो करताना जीभेची चव बिघडू शकते. ज्यामुळे चवीचे ज्ञान कमी होते. तर या गोष्टीची विशेष काळजी घ्या.

२. विविध अभ्यासानुसार, कोणता डाएट फॉलो केल्यामुळे ब्लड लेव्हल, व्हिटॅमिन बी १२ आणि व्हिटॅमिन D ची कमतरता होऊ शकते याची आधी माहिती करून घ्या आणि मगच डाएट फॉलो करा.

३. व्हेगन डाएट आयुष्यभर अर्थात कायमस्वरूपी फॉलो करण्यापूर्वी एकदा आहार तज्ञांचा आणि फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक आहे. (Vegan Diet Benefits)

‘हे’ पण वाचा:-

Vegan Diet – भाग 1: ‘व्हेगन डाएट’ म्हणजे काय..?; जाणून घ्या

Belly Fat : काही केल्यास पोटावरील चरबी कमी होत नाही..?; जाणून घ्या कारणे

Benefits Of Lemon Water: कोमट पाण्यातून लिंबाचे सेवन करा आणि अमृतासमान फायदे मिळवा; जाणून घ्या

Cumin Water For Weight Loss जिऱ्याच्या पाण्याने वेटलॉस करताय..? तर ‘या’ गोष्टींचे पालन जरूर करा; जाणून घ्या

Walking After Meals Benefits : नियमित जेवणानंतर ‘हे’ काम करा आणि लठ्ठपणा दूर करा; जाणून घ्या