Very simple ways to eat amla
|

आवळा खाण्याच्या ‘या’ आहेत खूप सोप्या पद्धती

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  आवळा हा आयुर्वेदाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे फळ आहे. आवळा हा जीवनसत्वांनी गुणसंपन्न आहे. आवळ्याचे अनेक शारीरिक फायदे आहेत. आवळा हा अनेक लोकांना खायला आवडत नाही. कारण आवळा हा फार तुरट लागत असतो. आवळ्यामधे असलेले अनेक औषधी गुणधर्म हे आपल्या शरीरात जाणे फार आवश्यक आहे. अश्या वेळी आवळ्याचा वापर हा वेगवेगळ्या पदार्थांच्या माध्यमातून केला असता, तो खाण्यास कंटाळवाणा वाटणार नाही.
वेगवेगळया पद्धतीने बनवून आवळा हा आपण सहज रित्या खाऊ शकतो. आवळा खाण्याच्या कोणत्या सोप्या पद्धती आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया……

आवळ्याची भाजी —

आवळा हा फार तुरट असल्याने सहसा कोणी आवळे खात नाही. पण आवळ्याची भाजी बनवून तुम्ही सहजरित्या आवळा हा खाऊ शकता. आवळ्याची भाजी बनवताना त्यामध्ये काही प्रमाणात गूळ घालावा त्यामुळे त्याला एक वेगळीच चव येते.

सुकवलेले आवळा —

आवळा असा खाऊ वाटत नाही तर तो सुकवून खाल्ला तर मात्र त्याचे जास्त फायदे होतात. आवळा याचे बारीक बारीक काप तयार करावेत आणि ते उन्हात सुकवत ठेवावेत. त्यामध्ये काही प्रमाणात लिंबाचा रस आणि काही प्रमाणात मीठ टाकून याचा वापर सुकवून सकाळी अनोश्यापोटी करावा . त्याने आपले पोट साफ होते.

आवळा ज्यूस —

सगळ्या पदार्थांपेक्षा आवळ्याचा ज्यूस हा आपल्या शरीराला फार लाभकारी आहे. कारण आवळ्याच्या ज्यूस मध्ये आपल्या शरीराला आणि हाडांना मजबूत बनवण्याचे काम करते . त्यासाठी काही प्रमाणात आवळा घ्यावा. त्याचे बारीक बारीक तुकडे करावेत त्यामध्ये आवळ्याचा चूर्ण एक चमचा टाकावा. आणि काही प्रमाणात दगडफूल चूर्ण एक चमचा मध आणि अर्धा कप पाणी टाकावे. ते पाणी पाणी मिक्स करून त्याचमध्ये काही प्रमाणात मध टाकावा आणि ते पिण्यास वापरावे.

मीठ आणि आवळा —

आपल्या आहारात जर मीठ आणि आवळा खाल्ला तर त्याचा खूप फायदा हा आपल्या शरीराला होऊ शकतो. मीठासोबत आवळा खाल्याने आपल्या जिभेला खूप चांगली चव येते.

आवळा आणि हळद —

हळद हि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असते. आवळ्याच्या वर ज्या पद्धतीच्या रेषा असतात त्या रेषा प्रथम धुवून काढाव्यात आणि उकळत्या पाण्यामध्ये आवळा आणि हळद हे एकत्र करून पाणी उकळावे . उकळलेला आवळा हा दररोज सकाळी आणि संध्याकाळी खावा. सकाळी काहीही न खाता आवळा हा खाल्ला जावा.