| | |

शरीरात ‘व्हिटॅमिन D’ची कमतरता म्हणजे आरोग्याचे नुकसान; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्याला निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगायचे असेल तर यासाठी आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे प्रत्येक पोषण घटक त्याला मिल्ने अत्यंत गरजेचे असते. यामध्ये व्हिटॅमिन्सचा मोठा सहभाग आहे. तर शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, ‘व्हिटॅमिन- डी’ आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. जर ‘व्हिटॅमिन D’ची कमतरता झाली तर असाही शरीराला अपाय आहेच. मात्र कोरोनाचे संकट पाहता आरोग्याच्या दृष्टीने हा धोका वाढू शकतो. कारण ‘व्हिटॅमिन D’मुळे आपली रोग प्रतिकार शक्ती मजबूत राहते. अशावेळी आपले शरीर कोणत्याही प्रकारच्या विषाणूंविरूद्ध लढण्यास तयार होते. अर्थात दररोज हजारो विषाणूंशी लढण्यासाठी आपल्या शरीरात ‘व्हिटॅमिन D’ची आवश्यकता असते. चला तर जाणून घेऊयात शरीरात व्हिटॅमिन D ची कमतरता असल्यास कोणती लक्षणे दिसून येतात आणि हि कमतरता भरून काढण्यासाठी आपण कोणत्या पदार्थांचे सेवन करावे ते खालीलप्रमाणे:-

लक्षणे

१) शारीरिक थकवा.

२) वारंवार आजारपण.

३) सतत सांधे दुखी, स्नायू दुखी वा अशक्तपणा.

४) भरपूर प्रमाणात केसगळती.

५) जखमा बऱ्या होण्यास वेळ लागणे.

६) ताण – तणाव आणि नैराश्य जाणवणे.

 

० ‘व्हिटॅमिन D’ची कमतरता भरून काढतील ‘हे’ पदार्थ

१) गायीचे दूध – गायीचे दूध ‘व्हिटॅमिन D’ने समृद्ध असते. यामुळे गायीचे दूध प्यायल्याने शरीराला जवळपास २०% ‘व्हिटॅमिन D’ प्राप्त होत असते. .

२) दही – दह्यामध्ये ‘व्हिटॅमिन D’चे प्रमाण अधिक असते. यामुळे दैनंदिन आहारात दह्याचा समावेश करा. जेणेकरून शरीरतील ‘व्हिटॅमिन D’ची कमतरता भरून निघेल.

३) संत्री – संत्र्यामध्ये ‘व्हिटॅमिन D’ समाविष्ट असते. यामुळे दररोज एक संत्रे वा संत्र्याचा फोर्टिफाईड रस पिणे फायदेशीर आहे. संत्र्यामुळे शरीराला १२% – १५% ‘व्हिटॅमिन D’ मिळते.

४) मांसाहार – तज्ञांच्या अभ्यासानुसार, मांसामध्ये ‘व्हिटॅमिन D’ चे प्रमाण अधिक असते. त्यामुळे मांसाहार करणाऱ्यांना याचा फायदा होतो.

५) भाजीपाला – जर तुम्ही मांसाहार करत नसाल तर मशरूम आणि रताळे खाऊन तुम्ही शरीरातील ‘व्हिटॅमिन D’ची कमतरता भरून काढू शकता.

६) अंड्यातील पिवळा भाग – अंड्यातील पिवळा भाग हा ‘व्हिटॅमिन D’ चा उत्तम स्रोत आहे. शिवाय यात प्रथिनेदेखील मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे अंड्यातील पिवळा भाग खाणे शरीराती ‘व्हिटॅमिन D’ ची कमतरता भरून काढण्यासाठी सहाय्यक आहे.

७) मासे – ‘मासे’ ‘व्हिटॅमिन D’चा उत्तम स्त्रोत आहेत. यासाठी आहारात ‘साल्मन’, ‘टूना’, ‘कॉड लिव्हर’, ‘हेरिंग फिश’ इत्यादीं माश्यांचा समावेश करावा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *