Monday, March 27, 2023

शरीरातील ‘या’ व्हिटॅमिन्स’ची कमतरता ठरू शकते ‘इन्सोमेनिया’चे कारण; जाणून घ्या

आवडल्यास नक्की शेअर करा

हॅलो आरोग्य ऑनलाईन आजकालची दगदग आणि धावपळीची जीवनशैली पाहता झोप न येणे फार सर्वसामान्य अशी समस्या झाली आहे. या समस्येला वैज्ञानिक भाषेत इन्सोमेनिया म्हणातात. ही समस्या दिवसेंदिवस लोकांमध्ये वाढत असल्यामुळे त्यामुळे अनेक लोक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. पण मित्रांनो, झोप न येण्याचे कारण आपल्या शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता असू शकते, हे किती लोकांना ठाऊक आहे? जर तुम्हाला याबाबत माहीत नसेल तर लगेच जाणून घ्या खालीलप्रमाणे:- :

– झोप कमी येणे वा झोपच न येणे यामुळे शरीराचे मोठ्या प्रमाणत गंभीर स्वरुपाचे नुकसान होते. त्यामुळे वेळीच या समस्येला चाप लावणे गरजेचे आहे. या समस्येचे मूळ कारण हे व्हिटॅमिन्सची कमतरता असू शकते. म्हणूनच आज आपण कोणत्या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे झोप येत नाही आणि इन्सोमेनिया’चे आपण शिकार होते हे जाणून घेणार आहोत.

१) व्हिटॅमिन डी’ची कमतरता:-
आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी चे प्रमाण कमी झाल्यास शरीर थकते, मानसिक थकवा येतो, झोप कमी येणे वा झोप न येणे अशी लक्षणे दिसून येतात. या समस्येवर उपाय म्हणून,
– दररोज सकाळी कोवळ्या उन्हात तसेच संध्याकाळी उन्ह उतरत असताना बाहेर फिरायला जा. कारण नैसर्गिक पद्धतीने सुर्य किरणांमधून व्हिटॅमिन डी मिळवता येते.

– याशिवाय व्हिटॅमिन डी’ने परिपूर्ण असे पदार्थ पुरेश्या प्रमाणात खा. यामुळे शरीरातील व्हिटॅमिन डी’ची कमतरता दूर होते. परिणामी इन्सोमेनिया दूर होण्यास मदत मिळू शकते. यामध्ये मासे, कॉडलिव्हर ऑइल, अंड्याचा पिवळा भाग, मशरूम, गायीचे दूध, सोया मिल्क, (सोयाबीनचे दूध), संत्र, ओट्स या पदार्थांचा समावेश होतो.

२) व्हिटॅमिन ‘बी 6’ ची कमतरता:-
मेंदूत मेलाटोनिन आणि सेरोटोनिन पुरेश्या प्रमाणात असल्यास गाढ झोप लागते. पण ही तत्त्व मिळवून देणारे व्हिटॅमिन ‘बी 6’ आपल्या शरीरात कमी झाले तर झोपेवर याचा परिणाम होतो. म्हणून यावर उपाय म्हणून,
– आपल्या आहारात चिकन, शेंगदाणे, सोयाबीन, ओट्स, केळे, दूध या पदार्थांचे सेवन करा. यामुळे इन्सोमेनिया ही समस्या दूर होण्यास मदत मिळते. परिणामी आपल्याला गाढ आणि आरामदायी झोप मिळते.


आवडल्यास नक्की शेअर करा

हे तुम्ही वाचायलाच हवे...