| | |

विराट कोहली सारखी घनदाट दाढी पाहिजे; ‘हे’ घरगुती उपाय केल्याने दिसाल रुबाबदार!!!

हॅलो आरोग्य ऑनलाईन : दाढी मिश्या ठेवण्याचा व त्या कोरण्याचा ट्रेंड गेल्या ३-४ वर्षात आलेला आपण पहिला आहे. हल्ली अनेक मोठ मोठे सेलेब्रिटी देखील अशा प्रकारे दाढी मिशा वाढवताना दिसतात. तसे पाहायला गेले तर पिळदार अशा मिशा आणि रुबाबदार दाढी ही तर महाराष्ट्रियन मराठी पुरुषांची जुनी ओळख परंतु ती हळू हळू संपली व अगदी मागील ५ वर्षा पूर्वीपर्यंत म्हणजे २०१५ पर्यंत पूर्ण मिशा व दाढी काढून शेव करणे लोक पसंद करत. पण आता तो ट्रेंड संपला व पुन्हा रुबाबदार दाढी आणि पिळदार मिशा ठेवण्याचा ट्रेंड आहे.

विराट कोहली सारख्या दाढी मिश्या ठेवणे अनेकांचे स्वप्न असते किंवा अनेक तरुणांना किंवा पुरूषांना मनातून हा ट्रेंड फॉलो करण्याची इच्छा असून देखील तो करता येत नाही. त्याचे कारण म्हणजे दाढी व मिशा न येणे किंवा व्यवस्थित न येणे. आणि मग असे दाढी वाढवण्याची इच्छा असणारे बरेच जण प्रश्न विचारताना दिसतात की दाढी येण्यासाठी काय करावे ? मिशी येण्यासाठी काय करावे ? अनेक जण दाढी वाढवण्यासाठी तेल किंवा दाढी येण्यासाठी औषध शोधत असतात. अशाच काही लोकांसाठी आम्ही ह्या लेखामध्ये दाढी येण्यासाठी काय उपाय करावे ते सांगणार आहोत.

दाढी येण्यासाठी काय करावे ? दाढी वाढवण्यासाठी घरगुती उपाय काय ? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ह्या लेखात देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. हे उपाय केल्यावर तुमची दाढी तर वाढेलच परंतु तुमचे शरीर देखील निरोगी व सदृढ राहील. चला तर मंडळी जाणून घेऊयात दाढी येण्यासाठी घरगुती काय उपाय करावे.

लिंबाचा वापर

लिंबू हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. दाढी येण्यासाठी किंवा दाढी वाढवण्यासाठी लिंबाच्या रसा सोबत दालचिनी पाऊडर किंवा तमाल पत्राची पाऊडर एकत्र करून पेस्ट तयार करा व हे मिश्रण तुमच्या चेहर्यावर ज्या ठिकाणी दाढी येत नाही किंवा कमी आहे अशा ठिकाणी लावा. साधारण १५ मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाका. लिंबाचा रस हा सगळ्यांच्या चेहऱ्याला सूट होईलच असे नाही ज्यांना त्रास होईल त्यांनी हे लावणे टाळावे ज्यांच्या त्वचेला हे लावल्यावर काही होणार नाही अशांनी आठवड्यातून ३ वेळा हे लेपण आपल्या चेहऱ्यावर लावावे साधारण २ आठवड्यात तुम्हाला रिजल्ट दिसायला सुरवात होईल.

शरीरातील प्रोटीनचे प्रमाण वाढवेल असा आहार घ्या.

तुमच्या जेवणात जेवढा जास्त प्रोटीन च समावेश असेल तेवढे तुमचे आरोग्य चांगले राहते हे तर तुम्हाला माहीतच असेल पण याचा परिणाम तुमच्या दाढी वाढण्यावर देखील होतो. तुम्ही जर नियमित प्रोटीन युक्त जेवण घेत असाल तर त्याचा तुमची दाढी येण्यासाठी नक्कीच उपयोग होईल. व्यसना पासून दूरच रहा. व्यसन कोणतेही असो ते तुमच्या आरोग्यास हानिकारक असते. आणि जर तुम्ही दाढी वाढवण्याचा निश्चय केला असेल तर व्यसनांपासून दूरच रहा.सिगरेट ओढल्याने देखील तुमची दाढी वाढण्यास बाधा येते,त्यामुळे जर तुम्हाला दाढी येत नसेल किंवा दाढी वाढत नसेल तर सिगरेट पासून दूरच रहा.

नारळाचे तेल दाढीला वापरा

नारळाचे तेल हे फक्त डोक्याचा केसांना लावावे असा गैरसमज आपल्याकडे आहे. हे नारळाचे तेल तुमच्या दाढी साठी देखील उपयुक्त आहे. दररोज थोडे नारळाचे तेल तुमच्या दाढीला किंवा तुमच्या चेहर्यावर जिथे दाढी येत नाही अशा ठिकाणी लाऊन मसाज करा.

सारखी दाढी करणे टाळा

अनेक पुरुषांचा गैरसमज असतो की सतत दाढी केल्यावर दाढी लवकर येते,किंवा चांगली येते. परंतु तसे नाहीये मित्रांनो,तुम्ही सतत दाढी केल्यावर उलट तुम्हाला चांगली दाढी येत नाही. त्यामुळे तुम्ही जर सतत दाढी करत असाल तर करू नका.

निलगिरीचे तेल वापरा

दाढी येतच नसेल तर निलगिरीच्या तेल तुमच्या चेहर्याला लावा, निलगिरीचे तेल खूप गुणकारी असते याचा वापर जर तुम्ही तुमच्या चेहर्यावर ज्या ठिकाणी दाढी येत नाही अशा ठिकाणी लावण्यासाठी केलात तर दाढी लवकर येण्यास किंवा दही वाढण्यास नक्कीच मदत होते. परंतु निलगिरीच्या तेला मुळे काहींच्या चेहर्याची आग होते असे होत असल्यास त्यात थोड्या प्रमाणात तिळाचे तेल मिसळावे आणि मग हे मिश्रण तुमच्या चेहर्याला लावा.

बाहेरचे पदार्थ खाणे शक्यतो टाळा

बाहेरचे म्हणजे हॉटेल मधले किंवा उघड्यावरील पदार्थ खाल्यावर तुमच्या शरीरातील चरबीचे प्रमाण वाढते त्याच बरोबर असे बाहेरचे खाल्यास ते तुमच्या दाढी वाढवण्याच्या प्रयत्नांना देखील अडथळा निर्माण करते. त्यामुळे जर तुम्ही तुमची दाढी वाढवण्याची हौस पूर्ण करण्यास इच्छुक असाल तर शक्यतो बाहेरचे खाणे टाळा.

आवळ्याचे तेल

आवळ्याचे तेल हे अतिशय गुणकारी असून, हे तेल जर तुम्ही नियमित पणे तुमच्या चेहऱ्याला लाऊन मसाज केल्यास ज्या ठिकाणी दाढी येत नाही किंवा कमी येते तिथे दाढी येण्यास नक्कीच मदत होईल. हे आवळ्याचे तेल चेहर्यावर साधारण १५-२० मिनिटे ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. आवळ्याच्या तेलाने मालिश केल्यास दाढी झटपट वाढते.

कढीपत्त्याचा वापर वाढवा.

तुम्ही रोज डोक्याला जे नारळाचे तेल लावता ते घ्या त्यामध्ये ७ ते ८ कढि पत्याची पाने टाकून हे मिश्रण १० मिनिटे चांगले गरम करा,कढिपत्याचा अर्क त्यामध्ये उतरला पाहिजे. आणि नंतर गार झाल्यावर हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर लावा. साधारण १० ते १५ मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून टाका. असे केल्याने देखील तुमची दाढी वाढण्यास मदत होईल.

चेहरा स्वच्छ ठेवा

दाढी वाढवण्याची हौस पूर्ण कराची असेल तर तुम्हाला नियमित पाने तुमचा चेहरा स्वच्छ ठेवावा लागेल. तुम्ही बाहेर फिरून आल्यावर चेहरा स्वच्छ धुवा, चेहर्यावरील घाण ही दाढी वाढण्यास किंवा नवीन दाढी येण्यास अडथळा निर्माण करत असते. त्यामुळे तुम्ही नियमित पणे तुमचा चेहरा स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. असे केल्यास नक्कीच दाढी वाढण्यास मदत होते.

नियमित व्यायाम

नियमित व्यायाम तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक आहेच पण त्या सोबतच नियमित व्यायाम केल्यास तुमची दाढी वाढण्यास किंवा दाढी येण्यास देखील मदत होते. रोजच्या रोज व्यायाम केल्यास तुमच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉन वाढण्यास मदत होते व शरीरातील टेस्टोस्टेरॉन वाढल्यामुळे तुमची दाढी वाढते.त्यामुळे मंडळी दाढी वाढवण्याची हौस पूर्ण कराची असेल तर नियमित व्यायाम करा.

ताणतणाव घेऊ नका

सतत टेंशन मध्ये राहणे तुमच्या आरोग्यास हानीकारक आहेच पण त्या बरोबरच सततच्या तणावामुळे तुमची दाढी वाढण्यावर देखील परिणाम होतो.त्याच बरोबर नियमित आणि पूर्ण झोप देखील तुमच्या शरीराला गरजेची आहे पूर्ण झोप न झाल्यावर देखील तुमचे दाढी वाढवण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे पूर्ण झोप व टेंशन न घेणे हे तुमची दाढी वाढवण्यास मदत करतात.

गाजर

तुम्हाला जर दाढी वाढवायची असेल तर गाजर हे तुमच्या आहारात असणे गरजेचे आहे. आपण नियमित पणे गाजराचा ज्यूस घ्यावा त्यामुळे देखील तुमची दाढी वाढण्यास मदत होईल.

कच्चे दूध

कच्चे दूध चेहऱ्याला लावल्यावर दाढी वाढण्यास मदत होते. रोज रात्री झोपताना चेहऱ्याला कच्चे दूध लाऊन झोपा असे केल्यास तुम्हाला ज्या ठिकाणी दाढी येत नाही किंवा कमी प्रमाणात येते अशा ठिकाणी दाढी वाढण्यास मदत होईल.

मध आणि काळी मिरी पाऊडर मिश्रण

थोडे मध त्यामध्ये काळी मिरी पाऊडर आणि काही थेंब लिंबाचा रस असे मिश्रण करून चेहर्याला लावा. नियमित पणे असे मिश्रण चेहऱ्याला लावल्याने देखील दाढी येण्यास मदत करते. हे मिश्रण साधारण १० ते १५ मिनिटे चेहर्यावर ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. या मुळे तुमच्या चेहरा मुलायम तर होईलच पण त्याच बरोबर ज्या ठिकाणी दाढी येत नाही तिथे देखील दाढी येईल.

तात्पर्य

वरील सर्व उपाय हे दाढी येण्यासाठी योग्य असून, आपल्या चेहर्याला कोणता उपाय योग्य आहे व आपल्याला यातील कोणती गोष्ट उपलब्ध होऊ शकते त्यानुसार आपण उपाय करावा. तुम्ही केलेल्या दाढी वाढवण्याच्या निश्चय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ह्या उपायांचा नक्कीच फायदा होईल.