| | | |

आरोग्यवर्धक फायदे हवे? तर मग स्टार फ्रुट खा; जाणून घ्या फायदे 

हॅलो आरोग्य ऑनलाईन। फळं खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, हे आपण सारेच जाणतो. पण फळांमध्येही अश्या अनेक विविध फळांच्या जाती आहेत ज्या आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास अत्यंत सक्षम आहेत. यातील एक आरोग्यवर्धक फळ म्हणजे स्टार फ्रूट. होय. स्टार फ्रुटमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, लोह, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम यासारखे खनिजे असतात. शिवाय यात एंटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत. यामुळे हे फळ निश्चितच आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच स्टार फ्रुटमध्ये सायट्रिक अॅसिड असते. यामुळे आपल्या शरीराला व्हिटॅमिन C आणि K मुबलक प्रमाणात मिळते.  त्यामुळॆ आपली रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनक्रिया यांसाठी लाभ होतो. चला तर जाणून घेऊयात स्टार फळाचे आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे:-

 

१) आंतरक्रिया सुरळीत होतात – स्टार फ्रूट खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. कारण स्टार फ्रूटमध्ये असे अनेक पौष्टिक पदार्थ असतात, जे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आणि फायदेशीर आहेत. जसे कि विविध व्हिटॅमिन्स आणि खनिजे. यामुळे आपल्या शरीराच्या आंतरक्रिया सुरळीत होण्यास मदत होते.

 

२) रोगप्रतिकार शक्तीत वाढ होते – स्टार फ्रूटमध्ये व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन B, लोह, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम यासारखे खनिजे असतात. शिवाय यात एंटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म समाविष्ट आहेत. यामुळे हे फळ सर्वप्रकारे आरोग्यासाठी मानले जाते. कारण हे सर्व गुणधर्म शरीराची आतून काळजी घेतात आणि रोगप्रतिकार शक्तीदेखील वाढवतात.

 

३) रक्तदाब नियंत्रणात राहतो – आपल्या आहारात स्टार फ्रूटचा नियमित समावेश असल्यास उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत होते. कारण स्टार फ्रुटमध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करते. तसेच स्टार फ्रूटचे नियमित सेवन केल्यास सोडियमचा प्रभाव कमी होतो.

 

४) हृदय निरोगी राहते – स्टार फ्रूट खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यामुळे लठ्ठपणा आणि स्ट्रोकचा धोका कमी होऊ शकतो. स्टार फ्रूटमध्ये कोणत्याही वाईट कॅलरीजचा आणि कोलेस्ट्रॉल चा समावेश नसल्यामुळे चरबीयुक्त गोळ्यांची समस्या, लठ्ठपणा आणि यकृताला धोका कमी असतो. परिणामी हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते.

 

५) पोटाच्या समस्यांवर मात करता येते – स्टार फ्रुट खाल्याने पोटाशी संबंधित सर्व आजार दूर होतात. कारण स्टार फ्रुटमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं जे आपली पचनक्रिया सुरुळीत ठेवण्याचं काम करतं. परिणामी बद्धकोष्ठता, अतिसार, गॅस, अपचन यासारख्या समस्यांपासून आपला बचाव करण्यासाठी हे फळ उपयुक्त ठरतं.

 

६) त्वचा संबंधित विकार दूर राहतात – स्टार फ्रूटमध्ये व्हिटॅमिन बी 9 आणि व्हिटॅमिन सी असते. हे घटक त्वचा संबंधित समस्या दूर करण्यास मदत करते. यामुळे आहारात स्टार फ्रुट असल्यास त्वचेवर मुरूम, पुटकुळ्या आणि रॅशेस येत नाहीत.