| |

इम्युनिटी वाढवायची आहे? मग टोमॅटो ज्यूस प्या ना; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण सारेच जाणतो कि टोमॅटोचा वापर हा स्वादिष्ट व्यंजने बनविण्यासाठी वा दैनंदिन आहारात केला जातो. मात्र टोमॅटोचा ज्यूस इम्युनिटी वाढवतो हे किती जण जाणतात? बहुतेक फार कमीच. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला इम्युनिटी बुस्टर असणारा टोमॅटोचा ज्यूस कसा बनवायचे ते त्याचे आरोग्याशी संबंधित असणारे फायदे सांगणार आहोत. अनेक लोकांना वारंवार सर्दी, खोकला, ताप नेहमी येत असतो. कारण त्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती अर्थात इम्युनिटी कमजोर असते आणि याच लोकांसाठी हा ज्यूस अगदी फायदेशीर आहे.
तर चला जाणून घेऊया हा ज्यूस बनवायचा कसा?

साहित्य: एक कप पाणी, एक चिमूट काळे मीठ, दोन टोमॅटो

कृती: सर्वात आधी टोमॅटो स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. यानंतर त्याचे बारीक काप करून घ्या. पुढे एका ज्यूसरमध्ये एक कप पाण्यासोबत टोमॅटोचे काप ४ ते ५ मिनीटपर्यंत ज्यूसरमध्ये चालवा. त्याचा तयार झालेला ज्यूस एका ग्लासमध्ये काढून घ्या आणि त्यात काळे मीठ टाका. झाला तुमचा इम्युनिटी बूस्टर ज्यूस तयार.

टोमॅटो ज्यूसचे फायदे –

१) रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ – टोमॅटोमध्ये व्हिटॉमीन सी अधिक प्रमाणात असते. हे शरिरात अॅण्टी ऑक्सीडेंट म्हणून काम करते. अँण्टी ऑक्सीडेंट एक्टीव्हिटी प्रमाणे काम करत असल्याने रोगप्रतिकारक क्षमता मजबूत करण्यासाठी ते खूप फायदेशीर असते.

२) कर्करोगाचा धोका कमी – संशोधनानुसार, रजोनिवृत्तीनंतर (मेनोपॉज) जास्त टोमॅटो खाणार्‍या स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. टोमॅटोमध्ये ग्लूटाथियोन नावाचा अँटीऑक्सिडेंट असतो. जो हार्मोन्सवर सकारात्मक प्रभाव टाकून कर्करोग दूर ठेवतो.

३) वजन कमी – टोमॅटोमध्ये कॅलरी कमी असतात. शिवाय यात जास्त प्रमाणात पाणी आणि फायबर असते, म्हणून वजन नियंत्रित ठेवण्यासाठी त्याला ‘फिलिंग फूड’ असेही म्हटले जाते.

४) शारीरिक शक्तीत वाढ – टोमॅटोमध्ये असलेले जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम हाडांच्या ऊतींना निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. त्यामुळे टोमॅटोचे नियमित सेवन केल्याने ब्रेन हैमरेजचा धोका कमी होते.

५) पचन शक्तीत वाढ – टोमॅटोमध्ये असलेल्या क्लोरीन आणि सल्फरमुळे पचनशक्ती वाढते. शिवाय गॅस आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या देखील दूर होतात. तसेच टोमॅटो शरीरातील हानिकारक पदार्थ बाहेर टाकण्यास मदतयुक्त ठरतो.