| | |

बेली फॅट कट करायचंय? मग काकडीचा ज्यूस प्या ना; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। वजन वाढू लागले कि सर्वांना एकच चिंता सतावते ती म्हणजे फॅट कट कसा करायचा. अनेकदा विविध व्यायामांनी शरीरावरील अतिरिक्त चरबी बर्न करण्यास मदत होते पण पोटावर जमा झालेली चरबी काही केल्या जात नाही. मग अश्यावेळी आपण हे बेली फॅट बर्न करण्यासाठी अनेक प्रकारच्या सप्लिमेंट्स घेतो. पण या सप्लिमेंट्सचा आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग काय? पुन्हा एकदा डाएट आणि खूप वेळ वर्कआउट. यात वजन कमी करण्यासाठी आहारात फळं आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करावा असे सांगितले जाते. पण आम्ही सांगू कि प्रामुख्याने काकडीचा ज्यूस देखील आहारात समाविष्ट करा. कारण यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते आणि परिणामी तुमचे वजन पटपट कमी होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काकडीचा ज्यूस बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती सांगणार आहोत. यासह त्याचे फायदेदेखील सांगणार आहोत. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

० साहित्य
– १ ग्लास पाणी
– १ काकडी
– १ लिंबू
– चवीनुसार काळं मिठ

० कृती – सर्वप्रथम काकडी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर काकडीची साल काढून ती चिरून घ्या. चिरलेली काकडी एका पाणी असलेल्या काचेच्या भांड्यात किंवा जारमध्ये ठेवा. या पाण्यामध्ये लिंबू पिळा. हे पाणी रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर एका ग्लासमध्ये पाणी घेऊन ते दररोज उपाशी पोटी प्या. यामुळे बेली फॅट्स कमी होतात.

० फायदे

१) काकडीच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, जिंक फ्लेवोनोइड्स आणि मॅग्नेशियम इत्यादी घटक असतात. त्यामुळे हा ज्यूस सर्वप्रकारे आरोग्यदायी आहे.

२) काकडीचा ज्यूस प्यायल्याने कमी श्रमात बेली फॅट बर्न होते. याशिवाय पचनक्रिया देखील सुधारण्यास मदत होते.

३) वजन कमी करायचे असेल तर साखर आणि स्टार्चचे प्रमाण जास्त असणारे पदार्थ खाणे टाळून काकडीचा ज्यूस प्यावा. यातून मिळणारे घटक शरीराला ऊर्जादेखील देतात आणि यामुळे वजनावर नियंत्रण राखण्यास मदत मिळते.

४) काकडीचा ज्यूस प्यायल्याने आपले शरीर डिटॉक्स करण्यासाठी देखील मदत मिळते. यामुळे शरीर आतून स्वच्छ होण्यास मदत मिळते.

५) काकडीचा ज्यूस पाययल्यामुळे चेहऱ्याला नैसर्गिक तेज येते आणि चेहरा प्रसन्न दिसतो.