| | | |

कोरोना काळात वाढलेला लठ्ठपणा कमी करायचा आहे? ‘हे’ आहेत जालीम उपाय (पूर्वार्ध)

हॅलो आरोग्य ऑनलाईन : तुम्हाला ‘लिफ्ट करा दे ……’ हे अदनान सामीचं गाणं आठवतंय का?  गाणं आठवायचे कारण म्हणजे आजचा विषय आहे.त्या गाण्यातील अदनान सामी आठवून बघा. हात पाय काडी आणि पोट ढेबेवाडी अश्या म्हणीप्रमाणे अदनान दिसत होता. तशी अवस्था अनेक जणांनी लॉक डाउन लागल्यापासून करून घेतली आहे. कोरोनाच्या अनेक दुष्परिणामांपैकी हा एक दुष्परिणाम आहे.  कोरोना काळ सुरू झाल्यापासून वर्क फ्रॉम होम वाढले आहे. अनेक लोक कमीत कमी घराच्या बाहेर पडत आहेत.  महिला आणि पुरूष असे दोघांमध्ये हे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. कमरेचा भाग, पोट, दंड या अवयवांमध्ये फॅट वाढल्याने काहीजणांचे शरीर बेढब दिसू लागले आहे. तुम्हालाही घरी बसल्याने अशी समस्या जाणवत असेल तर तातडीने पुढील उपायांना सुरवात करा. अन्यथा यातून दुसरे आजार उद्भवू शकतात.

कमी खाऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे व अत्याधिक खाणे दोन्ही आरोग्यासाठी घातक आहे. शरीराला कोणत्याही प्रकारचा अपाय न होता वजन कमी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आधुनिक जीवनशैलीमध्ये भरपूर खा, तयार बनविलेले पदार्थ खा, कितीही खा, अशा पध्दतीने आहार घेतला जातो, गरजेपेक्षा जास्त आहार शरीरात ढकलला जातो. आपल्याकडे अन्न पदार्थाचे स्वरूप, त्यातील पौष्टिक घटक न बघता फक्त पॅकिंग किंवा कंपनीचे नाव बघून अन्नपदार्थ खाल्ले जातात. या सर्व प्रकारामुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा जीवघेण्या आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे.

लठ्ठपणा एक आजार असून यामुळे इतर आजारांनाही आमंत्रण मिळते. हाय ब्लडप्रेशर, कंबरदुखी, हृदयाचे आजार, गुडघेदुखी यासारखे आजार होण्याचा धोका लठ्ठपणामुळे वाढतो. अनेकदा डायटिंग करून आणि जिममध्ये जाऊनही वजन कमी होत नाही. कारण त्यांचा आहार व्यवस्थित नसतो. योग्य आहार आणि व्यायाम केल्याने वजन लवकर कमी होऊ शकते. सात दिवसात वजन कमी करण्यासाठी कोणते उपाय आहेत त्यांची माहिती घेवूयात.

  • पपईचे नियमित सेवन वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. हे फळ प्रत्येक ऋतूमध्ये मिळते. पपईचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते.
  • तसेच दह्याचे सेवन केल्यानेही चरबी कमी होण्यास मदत होते. दिवसातून दोन-तीन वेळेस ताक प्यावे.
  • पिंपळाच्या सालीचे चूर्ण भाजून घेवून दररोज तीन ग्रॅम हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास बाहेर आलेले पोट कमी होईल.
  • आवळा आणि हळद समान मात्रामध्ये बारीक करून चूर्ण तयार करावे. हे चूर्ण ताकामध्ये टाकून घ्यावे. या उपायाने वजन जलद गतीने कमी होऊ लागेल.
  • वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी टोन्ड दुध, टोन्ड दही आणि टोन्ड पनीरचा वापर करावा. या पदार्थांमध्ये कॅलरी कमी असतात.
  • दररोज सकाळी आणि संध्याकाळी चालावे. कमीत कमी ४ किलोमीटर चालण्याचा नियम करावा. दुपारचे जेवण केल्यानंतर शतपावली अवश्य करावी.
  • रात्री साडेआठनंतर जेवण करत असाल तर पोळी आणि भाता ऐवजी डाळ आणि भाज्या असा हलका आहार घ्यावा.
  • जास्तप्रमाणात पांढरे पदार्थ म्हणजेच बटाटे, मैदा, साखर, तांदूळ आदी कमी करावे. मल्टीग्रेन किंवा मल्टीकलर पदार्थ म्हणजे डाळी, गहू, गजर, पालक, सफरचंद, पपई खाण्यावर जास्त भर द्यावा.
  • झोप घ्या – व्यायाम केल्यानंतर पुरेशी झोप घेणं सुद्धा आवश्यक असतं. पूर्ण आणि शांत झोप घ्या. किमान सात ते आठ तासांची झोप घ्या. सकाळी उशीरा उठत असाल तर, वजन कमी होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो, त्यामुळे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठायला हवं.

पोटाचा घेरा वेगाने कमी करण्यासाठी फक्त दृढनिश्चय आणि एकाग्रतेने जर आपण नियमित आचरण ठेवले तर सडपातळ होण्यापासून आपणास कोणीही प्रवृत्त करू शकत नाही. आहारावर नियंत्रण एवढीच गोष्ट महत्वाची नाही त्याबरोबर तुम्हाला  शारीरिक व्यायाम आणि योगासने देखील आत्मसात करावी लागतील. पुढील भागात आपण स्लिम होण्यासाठी योग्य व्यायाम आणि योगासने  यावर चर्चा करणार आहोत. तोपर्यंत लॉकडाउन मध्ये योग्य ती काळजी घ्या आणि नियमांचे पालन करा