|

दिवसभर तंदुरुस्त राहायचे आहे? मग नाष्ट्यात खा ‘हे’ अस्सल भारतीय पदार्थ!

हॅलो आरोग्य ऑनलाईन : नाश्त्याच्या वेळी पौष्टीक पदार्थ खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अभ्यासातून असे निदर्शनास आले आहे कि  जे लोक दररोज पौष्टिक नाश्ता करतात ते, नाश्ता न करणाऱ्यांच्या तुलनेत वजन कमी करण्यास अधिक सक्षम असतात. नाश्त्याच्या वेळी पौष्टीक पदार्थ खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.  म्हणून नाश्ता हा दिवसाचा सर्वात महत्वाचा टप्पा मानला जातो. निरोगी नाश्त्यामुळे शरीराचे चयापचय वाढते, ज्यामुळे तुमचा उष्मांक देखील वाढतो. निरोगी न्याहारीमध्ये भाज्या, फळे, कमी चरबीयुक्त डेअरी पदार्थ, लीन प्रोटीन आणि संपूर्ण धान्य इत्यादी बर्‍याच गोष्टींचा समावेश केला पाहिजे. चला तर, अशाच भारतीय पदार्थांबद्द्ल जाणून घेऊया, जे तुम्हाला नेहमी निरोगी ठेवतील

पोहे

सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण पोहे खाऊ शकता. त्यामध्ये कॅलरींचे प्रमाण खूप कमी आहे आणि चरबीही अजिबात नाही. पोह्यामध्ये लोह आणि फायबर अधिक असते, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी बर्न होते. याशिवाय असे बरेच गुणधर्म आहेत, ज्यामुळे आपले वजन कमी होऊ शकते.

इडली

जर तुम्हाला इडली आवडत असेल आणि तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला हे जाणून आनंद होईल की, इडली तुमचे वजन कमी करण्यात अतिशय फायदेशीर ठरते. इडली ही दक्षिण भारतीय खाद्य पदार्थ आहे आणि विशेषत: न्याहारीच्या वेळी ती खाल्ला जातो. तांदूळ आणि उडदाची डाळ वाटून तयार केला जाणारा ‘इडली’ हा पदार्थ, एक निरोगी अन्न आहे. त्यात तेल आणि लोणी वापरले जात नाही. इडलीमध्ये कॅलरींचे प्रमाणही कमी आहे. हेच कारण आहे की, तेलात तळलेले डंपलिंग्ज, समोसे आणि इतर स्नॅक्सपेक्षा हे अधिक चांगले आहे. त्याच बरोबर तुम्ही इडली बरोबर सर्व्ह केली जाणारी साईड डिश आणि चटणीदेखील खाणे टाळू शकता. असे करणे तुमच्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरेल.

उपमा किंवा शिरा 

उपमा हा देखील दाक्षिणात्य खाद्य पदार्थ आहे. आज तो भारताच्या कानाकोपऱ्यात पसंत केला जातो. उपमा हा पदार्थ पचनास खूप हलका आणि निरोगी आहे. रव्यापासून उपमा तयार केला जातो. वजन कमी करण्यासाठी हा नाश्त्याचा एक चांगला पर्याय आहे. उपम्यामध्ये भरपूर पोषण आहे, जे आपल्या आरोग्यास अनेक मार्गांनी लाभदायक ठरते.

डोसा

डोसा हा देखील दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ आहे. पण आता हा सगळीकडे मिळतो, हल्ली घरोघरी देखील नाश्त्यामध्ये डोसा दिसू लागला आहे. हा पदार्थ तुम्ही न्याहारी, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण आणि स्नॅक म्हणूनही खाऊ शकता. डोसा कार्ब आणि प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. हा आपल्याला बर्‍याच काळासाठी  उर्जावान बनवतो. यामुळे आपले हाडे आणि स्नायूही बळकट होतात. या पदार्थामध्ये चरबी कमी असते, ज्यामुळे आपल्या शरीरात कॅलरी वाढत नाहीत.

सांबर 

इडली, डोश्या सोबत मिळणारे सांबर देखील अनेक बाजूंनी पौष्टिक असते. शेवग्याची शेंग, बटाटा, टोमॅटो ,कांदा, मिरची आणि मसाले यांनी सांबर हे परिपूर्ण आहार होऊन जाते. कोणत्याची पदार्थबरोबर सांबर चवीमध्ये रंगत आणते.

अंडी

अंडी पोषण समृद्ध आहेत. अंडी हा प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. अंड्यामध्ये जीवनसत्व बी 12, डी आणि अँटीऑक्सिडेंट्स ल्यूटिन आणि झेक्सॅन्थिन असतात, ज्यामुळे आपल्या शरीरास बरेच फायदे होतात. अंड्यांद्वारे आपले वजन देखील कमी होते, अंड्यांमधील पौष्टिकतेमुळे आपली चयापचय ठीक होते.  शिवाय अंड्यांचे अनेकविध प्रकारचे पदार्थ देखील रुचकर  लागतात. अंड्यांमध्ये भरपूर चरबी असते, ज्यामुळे आपल्या शरीरात उष्णता निर्माण होऊ शकते. म्हणून उन्हाळ्याच्या दिवसांत अंडी कमी खाण्याचा सल्ला दिला जातो.

आता आपल्या लक्षात आले असेलच कि नाश्ता आणि तो हि पौष्टिक नाश्ता आपल्या शरीरासाठी किती महत्वाचा आहे.