| |

रात्री केस धुणे म्हणजे केसांच्या आरोग्याचे पुरते नुकसान; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सकाळी उठून केस धुवायचे ते सुकवायचे आणि मग घरातून कासाठी बाहेर पडायचे. बापरे बाप! किती ती घाई! मग सोप्पा उपाय काय? तर रात्रीच केस मस्त आरामात धुवायचे आणि शांत झोपी जायचं. मग काय सकाळी उठायचं आवरायचं निघायचं. हो कि नाही? यामुळे कसा वेळ पण वाचतो आणि घाईगडबड पण होत नाही. त्यामुळे अनेकदा अनेकजण याच पर्यायचा वापर करतात. पण तुम्हाला माहित आहे का? वेळ वाचवण्यासाठी तुम्ही हे जे काय करताय त्यामुळे तुमच्या केसांचे आरोग्य अक्षरशः धोक्यात आले आहे. तुमच्या रात्री केस धुण्याच्या सवयीमुळे केसांचे पुरते नुकसान होते हे समजून घ्या. जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर लगेच जाणून घ्या तुमच्या या सवयीमुळे केसांचे कसे नुकसान होते ते खालीलप्रमाणे :-

१) मोठ्या प्रमाणात केसगळती – रात्री केस धुतल्यानंतर ओल्या केसात झोपून गेलात तर केसांचा गुंता होतो. यानंतर गुंता झालेले केस विंचरणे कठीण होऊन बसते. पण तुम्ही ओले केसदेखील विंचरल्याने केस तुटतात आणि केसगळतीचा त्रास हमखास होतो. काही जण तर केसांना टॉवेल बांधून झोपतात. यामुळे आणखी केस नाजूक होतात. परिणामी केसगळती प्रचंड प्रमाणात वाढते आणि केस पातळ होतात.

२) कोंडा – रात्री केस धूत असाल तर कोंड्याच्या त्रासाला सामोरे जायला तयार व्हा. कारण केस धुतल्यानंतर ते वाळवणं तितकचं महत्वाचं असतं. पण तुम्ही न वाळवंट रात्री असेच झोपलात तर स्काल्प कोरडा होण्याची शक्यता असते. या कोरड्या स्काल्पलाच आपण कोंडा म्हणतो. त्यामुळे वेळीच हि सवय तोडली नाही तर हा त्रास जास्त होतो.

३) फंगस रिअॅक्शन – रात्री केस धुतल्यानंतर अर्धवट जरी ओले राहिले तर फंगस रिअॅक्शनचा त्रास होतो. कारण ओलावा कुठेही राहिला तर त्या ठिकाणी बुरशी येते. यामुळे रात्री केस धुतल्यानंतर पूर्ण कोरडे केले नाही तर स्काल्पवर ओलाव्यामुळे बुरशी येऊ शकते. परिणामी केसांसाठी आवश्यक असलेली छिद्र बंद होतात. त्यामुळे केसांच्या अन्य समस्यादेखील वाढतात.

४) डोकेदुखीचा त्रास – काहींना ओलावा अजिबात सहन होत नाही आणि डोकं जरा ओलं राहिलं तर त्यांना डोकेदुखी हमखास होते. त्यामुळे जर तुम्हालाही डोकेदुखीचा त्रास असेल तर रात्री केस धुवू नका.

५) सर्दी – रात्री केस धुतल्यानंतर ओलेच ठेवून झोपल्याने केसांत पाणी मुरते आणि पंख्याच्या वा एसीच्या हवेमुळे डोकं अतिशय थंड पडत. याचा परिणाम मेंदूच्या नसांवर देखील होऊ शकतो. शिवाय यामुळे हमखास होणार त्रास म्हणजे सर्दी. जसे पावसात भिजल्यावर डोके ओले राहिल्याने सर्दी होते हे देखील अगदी तसेच हे.

० काय काळजी घ्याल?

– रात्री केस घुसले तर न विसरता आणि टाळाटाळ न करता केस कोरडे करा.

– जर तुमच्याकडे ड्रायर असेल तर त्याच्या सहाय्याने केस कोरडे करा.

– रात्री केस धुणे अगदीच अपरिहार्य असेल तर ते संध्याकाळीच धुवा. ज्यामुळे रात्री झोपेपर्यंत ते सुकून जातील आणि ओले राहणार नाहीत.

– केस लवकर वाळवण्यासाठी ते झटकू नका.

– केस सुकवताना त्यांना पीळ घालू नका.

– केसांत गुंता राहू नये म्हणून ओल्या केसांत फणी फिरवू नका.

– केस वाळल्यानंतर त्यांना सीरम लावून मगच केस विंचरा.