Ways to get rid of cockroaches in the kitchen

स्वयंपाक घरातील झुरळे पळवण्याचे मार्ग

हॅलो आरोग्य  ऑनलाईन । स्वयंपाक घरात जर स्वच्छता असेल तर तुम्हाला सगळी कामे करण्याचा उत्साह हा जास्त वाढतो. त्यामुळे घर हे स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. आपल्या घरात जर खूप साहित्य असेल तर त्यावेळी घरात झुरळे हे वाढायला सुरुवात होते . अश्या वेळी आपल्या घरात झुरळे वाढू नयेत. यासाठी काय काय प्रयत्न केले पाहिजेत हे माहिती घेऊया …

सिलिका एअरोजेल आणि साखर —-

सिलिका एअरोजेल सहसा कपड्यांना आर्द्रता लागू नये म्हणून वापरतात. ऐरोजेल आणि साखर यांचे प्रमाण हे समप्रमाणात ठेवले तर सुद्धा झुरळे मरायला मदत होऊ शकते. आपल्या घरातील अडगळीच्या जागेवर आपण ते औषध हे पेरून ठेवू शकता. काही प्रमाणात पुदिन्याचे तेल घालू शकता. त्यामुळे झुरळे याचे प्रमाण हे कमी कमी होऊ शकते.

कांदा , लसूण पेस्ट —-

आपल्या घरातील कांदा , लसूण याचे प्रमाण सम प्रमाणात ठेवले तर त्याची पेस्ट करून एका लिटर मध्ये काही प्रमाणात पेस्ट तयार करून त्याचा वापर हा  करू शकता.

कडुलिंबाची पाने —-

जर तुम्ही तुमच्या घरात कडुलिंब याची पाने ठेवली तर सुद्धा घरातील झुरळयांचे प्रमाण कमी होऊ शकते. त्याची पाने सुकवून ती पाने आपण आपल्या घरात झुरळयाच्या ठिकाणी ठेवून द्यावे .

साबण आणि पाणी —-

साबण आणि त्याचे पाणी हे हे आपल्या घरातली आजुबाजुंच्या भागात टाकून द्या. डिटर्जंट आणि पाणी एकत्र करून त्याचा वापर हा जास्त प्रमाणात दररोज करा .

काकडी —

काकडी चे काही तुकडे डब्यात ठेवून ते उघडे करून ठेवा. काही वेळात काकडी आणि टिन याचे रासायनिक क्रिया होऊन त्याचा वास हा जास्त प्रमाणात येतो त्यामुळे झुरळे हे मरते .

बोरिक —-

बोरिक पावडर हि आपल्या धान्यासाठी वापरला जातो. बोरिक पावडर हे छोट्या छोट्या प्राण्यांना मारण्यास मदत करते. बोरिक ऍसिड मुळे किडे – मुंगे मारण्यास मदत होऊ शकते.

तमालपत्र —-

तमालपत्र हे भाजीसाठी वापरले जाते. तमालपत्र हे झुरळयांसाठी फार लाभकारक आहे.