| |

व्हिटॅमिन A, B, C, D माहित आहे, पण F माहित नाही?; तर लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या शरीराचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आपल्याला अनेक प्रकारची पोषक तत्त्वे आवश्यक असतात. यात विविध व्हिटॅमिन्सचा समावेश असतो. त्यातील A, B, C, D यांबद्दल आपण विविध ठिकाणांहून ऐकले असेल, यात काही शंकाच नाही. इतकेच काय, तर यांचा आपल्या शरीराला काय उपयोग होतो, त्याच्या कमतरतेमुळे होणारे अपाय हे हि आपण जाणतो. पण यामध्ये तुम्ही व्हिटॅमिन F बद्दल कधी काही ऐकले आहे का? जर तुम्हाला व्हिटॅमिन F बद्दल माहिती नसेल तर हा लेख न वगळता पूर्ण वाचा.

  • व्हिटॅमिन F हे शरीराला आवश्यक असलेल्या इतर जीवनसत्वांपैकीच एक महत्वाचे जीवनसत्व आहे. हे व्हिटॅमिन आपल्या शरीरातील अनेक क्रियांसाठी अत्यंत उपयुक्त असते. यात अल्फा लीनोलेनीड व लोनोलीस अशी आम्ले असतात. त्याचा उपयोग हृद्य आणि मेंदूचे कार्य योग्यरीतीने आणि सक्षमपणे कार्यरत राहावे यासाठी होत असतो.
  • व्हिटॅमिन F’चे आपल्या आरोग्यास अनेक फायदे आहेत. हृदयरोगाची जोखीम कमी करणे, मेंदूच्या समस्यावर काम करणे आणि मानसिक ताण तणाव कमी करणे, रक्तदाब नियंत्रित ठेवणे, सांधे आणि फुफ्फुसे यांची सूज कमी करणे यांसाठी हे जीवनसत्व मदत करते.
  • तसेच व्हिटॅमिन F ची शरीरात कमतरता असेल तर मेंदूच्या विकासात अडथळा निर्माण होतो. यामुळे केसगळती, मेंदूची कार्यक्षमता घटणे, त्वचा शुष्क आणि निस्तेज होणे अश्या समस्या उदभवतात.
  • व्हिटॅमिन F कोणत्या पदार्थांमधून मिळेल?

व्हिटॅमिन एफ हे खालील अन्नपदार्थांमधून मिळवता येते.
० बदाम
० अंडी
० मासे
० मटण
० सब्जा बी
० बेबी कॉर्न ऑईल
० सोयाबीन तेल
० जवस तेल
० काळे तीळ
० अवकॅडो
० अक्रोड