| | |

सॅलड खाल्लं म्हणून वजन कमी होते यात किती तथ्य आहे?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मित्रांनो तसे पहालं तर सॅलड म्हणजे काय? तर सोप्प्या भाषेत सांगायचं झालं तर कोशिंबीर. आता कोशिंबीर लव्हर किती असतील हे काय सांगायला नकोच. कारण अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत अनेकांना सॅलड खायला आवडत नाही. याचे कारण म्हणजे यात अनेक विविध प्रकारच्या भाज्या, कंदमुळे समाविष्ट असतात. खरंतर सॅलडमुळे जेवणाची चव वाढते आणि इतकेच नाही तर सॅलड वजन कमी करण्यासाठी मदत करते. अनेक लोकांना याबाबत एक मोठा प्रश्न पडला आहे कि, खरंच सॅलड खाल्लं म्हणून वजन कमी किंवा नियंत्रणात आणता येते का? तर आम्ही तुम्हाला या प्रश्नाचं अगदी साधं सोप्प उत्तर देणार आहोत. ते जाणून घ्यायचे असेल तर हा लेख पूर्ण वाचा.

० सॅलड खाल्लं म्हणून वजन कमी होतं का?
– जर सॅलड योग्य प्रकारे खाल्लं तर नक्कीच वजन कमी होतं. कारण ते आपली पाचनप्रणाली योग्य ठेवण्यास मदत करते. इतकेच नव्हे तर पोट साफ करण्यासदेखील मदत करते. याशिवाय शरीरात अतिरिक्त चरबी जमा होण्यास सॅलड प्रतिबंध करते आणि आपल्याला अति खाण्यापासून वाचव ते. परिणामी आपोआपच वजन नियंत्रणात राहते.

० सॅलड खाण्याची योग्य वेळ कोणती?
– जेवताना कोशिंबीर खाल्ल्याने पोषण मिळत नाही. त्यामुळे जेवणाव्यतिरिक्त जेव्हा भूक लागते तेव्हा किंवा जेवायच्या किमान १/२ तास आधी सॅलड खा. यानंतर, दुपारचे जेवण किंवा रात्रीचे जेवण केले तरी शरीराला उत्तम पोषण मिळते. पण मित्रांनो शरीराला संपूर्ण पोषण मिळते म्हणून सॅलड अधिक खाण्याची सवय लावून घेऊ नका.

० सॅलड अन्नाबरोबर का खाऊ नये?
– सॅलडचे तापमान अतिशय थंड असते आणि अन्नाचे तापमान अतिशय गरम असते. यामुळे जेव्हा कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र खाल्ले जाते तेव्हा ते पचनसंस्थेवर दबाव टाकतात. यामुळे ते पचवण्यासाठी आपल्याला अधिक ऊर्जेची गरज लागते. याव्यतिरिक्त अन्न पचण्यासाठी जास्त वेळ लागतो. ज्यामुळे पाचन प्रणालीवर विपरित प्रभाव पडतो.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *