| | | |

सुक्या खोबऱ्यापेक्षा ओले खोबरे अधिक फायदेशीर; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण सारेच जाणतो कि नारळाच्या झाडाला ‘कल्पवृक्ष’ म्हणतात. कारण या झाडाचा प्रत्येक भाग लोकोपयोगी आहे. या झाडाच्या खोडापासून ते फळापर्यंत प्रत्येक घटकाचा कोणत्या ना कोणत्या पद्धतीने उपयोग केला जातो. विशेष करून शहाळं आणि नारळ यांचा सर्वाधिक फायदा होतो. कारण भारतात अनेक जण रोजच्या आहारात नारळाचा आवर्जुन वापर करतात.

काहींना ओलं खोबरं आवडत तर काहींना सुक खोबर आवडत. मात्र सुक्या खोबऱ्यापेक्षा ओल्या खोबऱ्याचा आरोग्यासाठी अधिक लाभ होतो हे अनेकांना माहीतच नाही. त्यामुळे अनेक जण ते खाण्याचं टाळतात. मात्र ओल्या खोबऱ्याचे हे फायदे पाहिले तर नक्कीच प्रत्येक जण आहारात ओल्या खोबऱ्याचा समावेश करेल. चला तर जाणून घेऊयात ओल्या खोबऱ्याचे आरोग्याशी संबंधित फायदे कोणते ते खालीलप्रमाणे:-

१) केसगळतीवर प्रभावी – केस वाढीसाठी नारळाचं तेल आणि नारळाचं दूध दोन्हीही अत्यंत फायदेशीर आहेत. कारण केस गळत असल्यास नारळाच्या तेलाने किंवा दुधाने केसांच्या मुळाशी हलक्या हाताने मालिश केल्यास केस गळतीची समस्या हळूहळू दूर होते.

२) शरीराची जळजळ थांबवते – संपूर्ण अंगाची आग होत असेल किंवा जळजळ होत असेल आणि रक्त पडत असेल तर ओलं खोबरं, काळ्या मनुका आणि खडीसाखर यांचे एकमिश्रण करून खावे.

३) खवखवणाऱ्या घश्याला आराम – तसेच घसा खवखवून खोकला येत असेल तर ओला नारळ चघळून खावा. याशिवाय घसा सतत कोरडा पडत असेल तर ओल्या नारळाचा कीस आणि साखर खाल्ल्याने लगेच फरक पडतो.

४) शारीरिक ऊर्जा टिकवते – बऱ्याच काळाच्या आजारपणानंतर शरीरात त्राण नसतील किंवा शारीरिक थकव्यामुळे अशक्तपणा आल्यास त्या व्यक्तीने खडीसाखरेसोबत खोबरं खावं. यामुळे शरीरात ऊर्जेचा साठा कायम राहतो. तसेच जर वजन वाढत नसेल, तर गुळ आणि खोबरं एकत्र करून खावं आणि काही दिवसांनी वजन तपासून पहावे.

५) पचनाच्या तक्रारींवर परिणामकारक – पचनाच्या तक्रारींमूळे अनेक गंभीर आजार ओढवतात. मात्र या पचनाच्या समस्येपासून आराम मिळवायचा असेल तर रोजच्या जेवणात पुदिना, आले, लसूण, कडिपत्ता व ओला नारळ यांची चटणी खावी. शिवाय या चटणीत ओवा व सैंधव मीठ घातले तर वातामुळे शरीरात कुठेही कंप किंवा थरथराट भरणे कमी होते.

६) त्वचेसाठी लाभदायक – नारळाचे तेल केसांच्या मुलांना लावल्यामुळे केस झपाट्याने वाढतात, तसेच त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि त्वचेचा कोरडेपणा घालविण्यासाठी नारळाचे तेल प्रभावी औषध मानले जाते. त्यामुळे अनेक त्वचाविकारात बाहेरून येण्यासाठी नारळाचे तेल फायदेशीर आहे. यासाठी नारळाची करवंटी उगाळून किंवा करवंटीतून निघणाऱ्या तेलाचा उपयोग खरूज, नायटा किंवा पांढरे डाग घालवण्यासाठी केला जातो.