| | |

रक्ताभिसरणास सहाय्यक क्रूसीफेरस भाज्या म्हणजे काय?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या शरीरातील प्रत्येक क्रिया सुरळीत पार पडत असेल तर आरोग्याची फारशी चिंता करावी लागत नाही. पण यासाठी आपल्याला आपल्या आरोग्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. अनेकांना वाटते कि निरोगी असणे म्हणजे बाह्य सौंदर्य. पण मित्रांनो बाहेरून निरोगी असणं महत्त्वाचं असलं तरी आतून निरोगी असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण हे आपल्या दीर्घायुष्यासाठी गरजेचं आहे. मुख्य म्हणजे निरोगी आरोग्यासाठी आपल्या शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया उत्तमरीत्या सुरु असणे गरजेचे आहे. यासाठी तज्ञ सांगतात कि, आपल्या रक्तवाहिन्यांची काळजी घेण्यासाठी आणि आपल्या रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांपासून दूर राहण्यासाठी आपल्या आहारात क्रूसीफेरस भाज्या असणे आवश्यक आहे.

आहार तज्ञ सांगतात की, क्रूसिफेरस भाज्या हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी करू शकतात. पण त्याबद्दल पूर्ण खात्री नव्हती. यानंतर आता नव्या अभ्यासातून असा निष्कर्ष समोर आला आहे कि, क्रूसीफेरस भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ‘के’ आढळते. जे कॅल्सिफिकेशन प्रक्रियेस प्रतिबंध करू शकते म्हणजेच रोखू शकते.

० क्रूसीफेरस भाज्या म्हणजे काय?
– ब्रोकोली, ब्रसेल्स स्प्राउट्स, कोबी आणि फ्लॉवर या सर्व भाज्या क्रूसीफेरस भाज्या म्हणून ओळखल्या जातात. जठरासंबंधी, पोट, फुफ्फुस, स्तन आणि कर्करोगाच्या वेगवेगळ्या विकारांचा धोका टाळण्यासाठी या भाज्यांचे सेवन करणे फायदेशीर आहे. कोलोरेक्टल, स्वादुपिंड आणि मूत्राशय कर्करोग यासाठीही या भाज्या उत्तम असतात. क्रूसीफेरस भाज्यांमध्ये आढणारी पोषक तत्वे खालीलप्रमाणे:-

१) व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई, फोलिक ऍसिडसारखे जीवनसत्त्वे

२) जेनिस्टिन, क्वेरेसेटिन, केम्फेरोल यासारखी फ्लेव्होनोइड्स

३) सेलेनियम, कॅल्शियम आणि पोटॅशियम सारखी खनिजे

४) ओमेगा – 3 फॅटी ऍसिड सारख्या पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड

५) मेलाटोनिन (झोपेच्या जागांचे नियमन करणारे हार्मोन)

क्रूसीफेरस भाज्या खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे:-

१) शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होते.

२) हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीत विकारांवर गुणकारी.

३) रक्तातील साखर नियंत्रित करते

४) पचनक्रिया सुधारते

५) सांध्यातील वेदना कमी होतात.

६) कोलेस्टेरॉल कमी होते.

७) वजन कमी करण्यास मदत करते