| | |

प्राचीन औषधीयुक्त च्यवनप्राशचे सेवन कसे केल्याने काय फायदे होतात?; लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। ‘च्यवनप्राश’ एक प्रकारचे चाटण आहे. जे विविध प्रकारच्या जवळपास ५० प्राचीन जडीबुटी एकत्र करून बनविले जाते. त्यामुळे हे एक आयुर्वेदिक उत्पादन आहे. सर्दी असो वा खोकला यापासून वाचण्यासाठी आणि रोग प्रतिरोधक क्षमता वाढवण्यासाठी च्यवनप्राश खाणे निश्चितच फलदायी आहे. असे म्हटले जाते की च्यवनप्राश या औषधी चाटणाचा शोध सुर्य आणि संध्या पुत्र अश्विनीकुमार यांनी लावला आहे. एका प्राचीन कथेत म्हटले आहे कि, च्यवनप्राशचा शोध अश्विनीकुमार यांनी च्यवन ऋषिंसाठी केला होता. होय. जेव्हा च्यवन ऋषी अत्यंत वृद्ध झाले तेव्हा अश्विनीकुमार यांनी त्यांना पुन्हा यौवन प्राप्त करण्यासाठी एक विशेष औषधी चाटण बनवून दिले. पुढे च्यवन ऋषी यांनी पहिल्यांदा या औषधाचा वापर केल्याने याचे नाव “च्यवनप्राश” ठेवण्यात आले.

च्यवनप्राश या औषधी चाटणात अनेको प्राचीन औषधींचा वापर केला जातो. यांपैकी आवळा, अडुळसा, तुळशी, अश्वगंधा, निंब, केसर, घी, मध, लवंग, इलायची, बेल, कलमी, पिंपळपान, द्राक्ष, तेज पत्ता, हळद, नाग केसर, शतावरी, तिळाचे तेल या औषधी माहित असलेल्या औषधींपैकी मोडतात. तर अन्य औषधींचा उल्लेख आयुर्वेदात गुणधर्मांसह मिळेल. जाणून घेऊया च्यवनप्राश कसे प्राशन करावे आणि ते खाण्याचे फायदे काय? खालीलप्रमाणे:-

१) रोगप्रतिरोधक क्षमता वाढते – च्यवनप्राश आरोग्य सुधारतेच शिवाय रोग प्रतिरोधक क्षमता वाढवते. कारण हे एक संपूर्ण स्वास्थ्य सप्लीमेंट आहे जे रोगांना दूर ठेवण्यास सक्षम आहे.

२) हृदयाची काळजी – एका संशोधनानुसार च्यवनप्राश हृदयाच्या नसांना मजबूत करते आणि हृदयातील रक्तप्रवाह सुरळीत ठेवते. याशिवाय हृदयाची अनियमित धडधड देखील नियंत्रणात ठेवते.

३) पचन सुधार – चवनप्राशचे सेवन केल्यामुळे खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचते आणि मलत्यागद्वारे नियमित पोट साफ होते. यातील विविध जडीबुटी पचन सुधारतात आणि कब्जच्या समस्येपासून मुक्ति देतात.

४) मेंदूसाठी लाभदायक – च्यवनप्राशमध्ये एंटीऑक्सीडेंट असतात. जे कमी होत असलेल्या स्मरणशक्तीला वाढवतात आणि मेंदूतील पेशींना पोषण देतात. अनिद्रा, विस्मरण, मानसिक अस्थिरता, अल्जाइमर आणि मेंदू यांसंबंधी रोगांमध्ये च्यवनप्राश उपयोगी आहे.

५) हाडांना मजबुती – च्यवनप्राश खाल्ल्यामुळे हाडांना मजबूती मिळते. कारण यात हाडांमधील कॅल्शियम आणि प्रोटीन वाढवण्याची क्षमता आहे. त्यामुळे ज्या लोकांना हाडांसंबंधी विकार असतील त्यांना दुधासोबत चवनप्राश खाण्याचा सल्ला दिला जातो.

० च्यवनप्राश खाण्यासंदर्भातील अत्यंत महत्वाच्या बाबी :-

१) दिवसभरातून एकदाच सकाळी रिकाम्या पोटी च्यवनप्राश खावे.

२) च्यवनप्राशचे सेवन दुधासोबत केल्यास अधिक पोषण प्राप्त होते. याशिवाय कोमट पाण्यासोबतही च्यवनप्राश खाल्ले जाऊ शकते.

३) च्यवनप्राश खाल्ल्यानंतर त्यावर मसालेदार आणि आंबट पदार्थ खाऊ नये.

४) अगदी लहान बाळाला अर्थात १ वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या बाळाला च्यवनप्राश देऊ नये.

५) साधारण १ ते ५ वयोवर्ष असणाऱ्या लहान मुलांना २.५ ते ५ ग्राम अर्थात १/२ (अर्धा)चमचा च्यवनप्राश द्यावे. तसेच ६ ते १२ वयोगटातील मुलांना १ चमचा च्यवनप्राश देणे योग्य ठरेल. तर १२ वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या तरुणवर्गाने १-२ चमचे च्यवनप्राश दिवसातून एकदाच खावे.

६) गरोदर महिलांनि १/२ (अर्धा) चमचा यापेक्षा अधिक च्यवनप्राश खाऊ नये.