ova

सकाळी सकाळी कपभर ओव्याचे पाणी पिण्याचे काय आहेत फायदे ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  आपल्या आहारात ओवा हा वापरला जातो. तो अनेक गुणधर्मांनी  समृद्ध असा आहे .ओवा  हा   पोटासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. अनेक पदार्थाना चव येण्यासाठी ओवा हा वापरला जातो. ओव्याचे पाणी सुद्धा खूप लाभकारक आहे . ज्यावेळी आपल्या पोटात अचानक दुखत असेल तर ओवा हा  चघळण्यासाठी वापरला जातो. ओवा हा तर महत्वाचा आहेच , पण त्याबरोबर त्याचे पाणी सुद्धा तितकेच लाभकारी आहे .

ओव्यांमध्ये कार्बोहाड्रेट्स चे प्रमाण जास्त असते . ज्या लोकांना आपले पोट कमी करायचे आहेत त्या लोकांनी आपल्या आहारात ओवा याचे पाणी ठेवले गेले पाहिजे . सकाळी सकाळी पोट रिकामे असताना ते पाणी पिले तर मात्र त्याचा प्रभाव पडून काही दिवसांत आपले पोट कमी झालेले दिसून येते. त्यासाठी कमीतकमी एक चमचा हा छान मंद आचेवर भाजून ठेवा. पण ते काळे पडेपर्यंत भाजू नये . ते भाजल्यानंतर रात्रभर पाण्यात ठेवावे आणि सकाळी उठल्या उठल्या ते सारे पाणी हे ढवळून पिले जावे . त्याने गॅसेस च्या समस्या या निर्माण होत नाहीत.

सकाळी सकाळी ओव्याचे पाणी पिल्यानंतर त्यातील पाचकप्रणाली हि योग्य रित्या काम करायला सुरुवात करते . त्यामुळे बुध्दिकोष्ठता यासारख्या समस्या दूर होतात. आपल्या पोटाची चयापचन क्षमता वाढते . तसेच गॅसेस च्या समस्या सुद्धा कमी होतात. स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात ओटीपोटी च्या समस्या या जास्त जाणवतात. त्यावेळी पाणी जर कोमट केले आणि त्यात काही प्रमाणात ओवा मिसळून ते पाणी पिले तर त्यामुळे दुखणे  कमी होत जाते . ज्यावेळी दात दुखतात त्यावेळी दातांच्या समस्या दूर करण्यासाठी ओवा आणि त्याचे पाणी याच्या मदतीने गुळण्या करा . काही वेळात दात दुखी कमी होत जाते .