mug

रोज सकाळी सकाळी अंकुरलेले मूग खाण्याचे हे आहेत फायदे ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या शरीरात प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आहारात दररोज काही ना काही प्रमाणात पौष्टिक पदार्थ असणे गरजेचे आहे . नेहमी सकाळचा काही प्रमाणात नाश्ता , जेवण आणि संध्याकाळचे जेवण हे ठराविक वेळेतच करणे आवश्यक आहे . त्यामुळे कोणत्याही आजारांना बळी पडू शकत नाही. सकाळच्या न्याहारी मध्ये काही प्रमाणात मोड आलेल्या धान्यांचा वापर केला तर तो फायदेशीर ठरतो. कसे ते जाणून घेऊया ……

अंकुरलेल्या मुगामध्ये जास्त प्रमाणात फायबर असते . फायटर्स, मॅग्नेशियम, लोह , व्हिटॅमिन, अँटी ऑक्सिडंट , लोह आणि फॉलिक ऍसिड याचे प्रमाण हे जास्त असते . त्यामुळे आहारात घेतल्याने प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. ज्या लोकांना मधुमेह आहे . त्या लोकांनी आपल्या आहारात अंकुरलेले मूग खाऊ शकता. त्यामुळे ग्लुकोज ची पातळी वाढण्यास मदत होते. तसेच कोलेस्ट्रॉल ची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. ज्या लोकांना वजन कमी करायचे असेल तर त्या लोकांनी डाएट मध्ये मुगाच्या भाजीचा समावेश करावा.

ज्या लोकांना सतत नवीन पदार्थ खाल्ले तर त्यावेळी अपचनाच्या समस्या या जास्त निर्माण होऊ शकतात. अशा वेळी जर आहारात मुगाची भाजी फक्त ठेवली तर मात्र अपचनाच्या समस्या पासून दूर राहू शकतात. त्यामध्ये भरपूर प्रमाणात एन्झायम असतात . त्यामुळे बुद्धकोष्टिता च्या समस्या या अजिबात निर्माण होत नाहीत . तसेच मूग हे चेहऱ्यावरील सुरकुत्या सुद्धा कमी करण्यास मदत करते .