What are the causes of skin infections?

त्वचा संसर्ग होण्याची काय आहेत कारणे ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  आपल्याला त्वचेच्या समस्या या कधी कधी जास्त प्रमाणात जाणवतात. त्वचा जर स्वच्छ नसेल किंवा इतर आजर असतील तर अश्या वेळी आपली त्वचा हि खूप खराब झालेली दिसते . अश्या वेळी आपल्याला त्वचेची काळजी घेणे गरजेची आहे. आपली त्वचा हि जास्त करून आपल्या सौदर्याचा एक महत्वाचा भाग आहे . त्वचा सुंदर असेल तर आपले सौदर्य हे छान दिसण्यास मदत होते.

अनेकांना त्वचेचे आजार होण्याची कारणे हि वेगवेगळी आहेत . अनेकांना काही प्रमाणात धुळीची ऍलर्जी असते . त्यामुळे सुद्धा त्वचेचे आजार होण्याची शक्यता हि जास्त असते. अनेक लोक हे बाहेरचे पदार्थ हे जास्त प्रमाणात खातात त्यामुळे सुद्धा त्यांना त्वचेचे आजार होण्याची शक्यता हि जास्त असते. आपली त्वचा स्वच्छ राहण्यासाठी दररोज अंघोळ करणे आवश्यक आहे . त्यामुळे त्वचेची स्वच्छता हि खूप जास्त प्रमाणात राहते. ज्या लोकांना त्वचेचे आजार आहेत त्या लोकांच्या संपर्कात जाण्याने सुद्धा त्वचेच्या समस्या या जास्त जाणवू लागतात. ज्यावेळी अंघोळ कराल त्यावेळी जर आपली त्वचा कोरडी केली नाही तरीसुद्धा त्वचेच्या समस्या या जास्त निर्माण होताना दिसतात. अनेक लोकांना आपल्या त्वचेसाठी केमिकल चा वापर हा जास्त प्रमाणात केला जातो. त्यामुळे त्वचेचा दाह निर्माण होऊन त्वचेच्या समस्या या जास्त निर्माण होताना दिसतात.

लक्षणे —

त्वचेला खाज निर्माण होते व कोंड्याची निर्मिती होते. सतत त्वचेचा दाह निर्माण होत असेल तर त्यामुळे त्वचा सारखी खाजवावीशी वाटते. आपल्या त्वचेवर जर जास्त प्रमाणात पुरळ येत असतील तर जाणून जावे कि काहीतरी त्वचेच्या समस्या या निर्माण होत आहेत. त्वचा कोरडी पडते आणि त्वचेला दाह होतो. त्वचेचा रंग बदलतो. अश्या वेळी त्वचा हि खूप लाल वाटत असते. त्वचेला दुर्गंधी हि जास्त प्रमाणात वाढते. त्यामुळे आपल्या त्वचेची दुर्गंधी कमी करण्यासाठी त्वचेची स्वछता ठेवणे जास्त आवश्यक आहे .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *