| |

आपली मुले व्यसनाधीन होण्याची कारणे काय?; जाणून घ्या लक्षणे आणि घ्यावयाची काळजी

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अलीकडे संपूर्ण जगभरात बॉलिवूड सेलिब्रिटी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचे क्रूझ पार्टीतील ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजले होते. सध्या आर्यन खान तुरुंगाबाहेर असला तरीही त्याच्यावर खटला मात्र सुरूच आहे. या प्रकरणानंतर सर्व जगातील पालक मंडळींना मात्र एक प्रश्न आणि एक चिंता चांगलीच भेडसावताना दिसतेय. ती म्हणजे काय आपली मुलंदेखील व्यसनी आहेत? आपल्या मुलांनाही अमली पदार्थांचे व्यसन आहे का? आपली मुलं आपल्यापासून लपवून असे काही करत असतील का?

खरंतर हि भीती वाटणे फारच साहजिक आहे कारण, आजकालचे पालक आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिवस रात्र काम करत असतात. परिणामी ते आपल्या मुलांना वेळ देऊ शकत नाहीत. अश्यावेळी मुलं काय करतात? कुठे जातात? कोणासोबत असतात? त्यांच्या आयुष्यात सध्या काय सुरु आहे? यातील कोणत्याही प्रश्नांचे उत्तर पालकांकडे नसते. अशावेळी मुलं व्यसनाच्या आधीन जातात. हे पालकांच्या उशिरा लक्षात येते आणि यामुळे मुलांना व्यसनापासून दूर नेणे कठीण झालेले असते. म्हणून आज आम्ही तुम्हाला मुले व्यसनाधीन होण्याची कारणे, लक्षणे आणि मुलांना व्यसनापासून दूर नेण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

० कारणे:-

१) वाईट संगती
२) चुकीचे निर्णय
३) एकटेपणा
४) सहका-यांचा दबाव
५) मनोरंजनाच्‍या उद्देशाने मादक पदार्थांचे सेवन
६) दादागिरी- गुंडगिरी
७) मुलांच्या यशाकडे पालकांचे दुर्लक्ष
८) अस्‍वस्‍थ कौटुंबिक वातावारण
९) वास्‍तविकतेपासून दूर
१०) मोठ्यांच्या वागणुकीची छाप

० लक्षणे :-

१) लाल डोळे आणि त्वचा
२) अस्वस्थ झोप
३) अचानक वजन कमी होणे
४) बोलताना अडखळणे
५) अस्‍पष्‍ट जखमा
६) तोंड, श्‍वास, कपड्यांमधून वेगळा वास येणे
७) थकलेले शरीर
८) उजेड टाळणे, अंधुक दिसणे
९) चिडचिडपणा, उदासीनता
१०) वर्तणूकीत बदल:-
– अवधान, रूचीचा अभाव आणि लक्ष केंद्रित करण्‍यामध्‍ये असक्षम
– सुस्‍त, स्‍वत:ची अस्‍वच्‍छता / दिसण्‍याकडे लक्ष न देणे
– नैराश्‍य, चिंता
– सतत मूड बदलणे
– कमी आत्‍मविश्‍वास
– आक्रमक वृत्ती
– लालसा
– स्‍वत:चा नाश करण्‍याची वा स्‍वत:ला दुखापत करण्‍याची वृत्ती
– सतत खोटे बोलणे/ चोरी करणे
– अचानक शैक्षणिक कामगिरी खालावणे.

 

० मादक पदार्थांच्‍या व्‍यसनापासून दूर ठेवण्‍यासाठी पालक मुलांना कशाप्रकारे मदत करू शकतात?
– सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमची मुलं अशा पदार्थांच्या आहारी गेली असतील तर तुम्‍ही स्थिती काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे आहे. खालील बदल स्वतःत करालं तर मुलांची काळजी घेणे सोपे जाईल.

१) तुमच्‍या मुलाला मादक पदार्थांचे व्यसन लागले असल्‍याचे समजल्‍यानंतर प्रतिसाद द्या. मात्र प्रतिक्रिया देऊ नका.

२) प्रखर व रागीट प्रतिक्रियेमुळे स्थिती सुरळीत होणार नाही. त्यामुळे संयमी रहा.

३) अशी गोष्ट उघड झाल्यास मुलांना समजून घेत त्यांचे संपूर्ण मत ऐकण्‍याचा प्रयत्‍न करा.

४) संवादातून मुलांना जवळ करा. कदाचित दोघांसाठी हा संवाद अस्‍वस्‍थ करणारा असू शकतो, पण संवाद साधणे आवश्‍यक आहे.

५) मुलांना त्यांच्या भावनांना आपले समर्थन व दयाळूपणा दाखवा.

६) मुलांसाठी सुरक्षा कवच बना. मुलांना कळू द्या की, त्‍यांना तुमचा आधार आहे आणि त्‍यांना सोडून देणार नाही.

७) तुमच्‍या मुलाला व्‍यावसायिक समुपदेशनाची गरज भासू शकते. हे समुपदेशन बाहेर जाऊन करता येते वा घरामध्‍ये उपचार करता येऊ शकतो.

८) मुलांनी उपचारामध्‍ये सामील होण्‍याची खात्री करा.

९) आपल्या मुलांची स्थिती उत्तम होण्‍यासाठी सकारात्‍मक पालक होण्याचा निर्धार करा आणि कठीण प्रसंगात मुलांचा आधार व्हा.

१०) आपल्या मुलांसोबत वेळ घालवा. गप्पा, गोष्टी, प्रसंग आणि अनुभवांची देवाणघेवाण करा.

 

० लक्षात ठेवा!
– कोणताही माणूस जन्मापासून वाईट वा व्यसनाधीन नसतो. प्रत्येक गोष्टीमागे एक कारण असते. ते कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा. जगात कुणीही जन्माला येताना सोबत घेऊन येत नाही. मात्र आयुष्यभर एकटाही राहत नाही. त्यामुळे आपल्या संगतीचा इतरांना लाभ द्या आणि स्वतःसह इतरांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा.