What are the benefits of sleeping on the baby's stomach?

बाळाला पोटावर झोपण्याचे काय तोटे ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । लहान वयातील बाळाच्या आरोग्याच्या काळजी घेणे गरजेचे आहे . बाळ लहान असताना त्यांच्या समस्या कोणत्या कोणत्या आहेत.  आईला माहिती असणे  गरजेचे आहे. लहान बाळाच्या  झोपण्याच्या वेळा अवेळी असतात.  ते  नेहमी एका ठराविक वेळेत झोपते असे नाही . पण त्याचा झोपण्याचा कालावधी हा जास्त असतो. जर बाळ कमी वेळेसाठी झोपत असेल तर ते आरोग्याच्या दृष्टीने  योग्य नाही. पण जर बाळ हे पोटावर झोपत असेल तर त्यावेळी मात्र त्याला कोणत्या प्रकारचा त्रास हा होऊ शकतो ते जाणून घेऊया …

अनेक वेळा बालरोगतज्ञ् असे सांगतात कि , कमीत कमी पहिले बारा महिने तरी बाळाला पोटावर झोपायला देऊ नका, कारण बाळ लहान असताना अनेक वेळा बाळ आपला उच्छवास सोडून ते श्वास घेत असते . ऑक्सिजन सुद्धा घायला त्रास हा होऊ शकतो. त्यामुळे बाळाचे ऑक्सिजन लेव्हल हि कमी कमी होऊ शकतो. त्यामुळे फुफुसांचे कार्य हे कमी कमी होऊ शकते . त्यामुळे बाळाला जास्त वेळ पोटावर झोपू देऊ नये . कमीत कमी एक वर्ष होईपर्यंत बाळाला पोटावर झोपायला देऊ नये . बाळाला नेहमी पाटीवर झोपायला द्यावे . कारण त्यामुळे श्वसन मार्गाच्या समस्या या काही प्रमाणात कमी कमी होऊ शकतात . नवजात बाळाची श्वास घेण्याची क्षमता तेवढी विकसित झालेली नसते .

भारतातील जवळपास हे अनेक बालकांचे मृत्यू हे SSID मुळे झाले आहेत . पहिल्या काही दिवसांमधील बाळाला श्वासाच्या समस्या असतील तर मात्र बाळाच्या पोटावर काही प्रमाणात मालिश करणे आवश्यक आहे . बाळ सहा महिने झाले असेल तर त्यावेळी ते पुढे पुढे सरकते त्यामुळे मानेवर बाळाचा भार हा जास्त येत नाही . बाळाला अजिबात पोटावर जास्त झोपू देऊ नये . त्याच्या जवळ जर कोणी नसेल तर त्यावेळी त्याला मात्र पोटावर झोपू देऊ नका .