mango

काय आहेत आंब्याचे औषधी गुणधर्म

हॅलो आरोग्य ऑनलाईन । उन्हाळा सुरु झाला कि , आंबे यायला सुरुवात होते . मार्च महिन्यांपासून आंब्याच्या झाडाला मोहर यायला सुरुवात होते . आंबा आहे खूप गोड़ असतो. कच्या तसेच पिकलेल्या आंब्यापासून नवनवीन पदार्थ तयार केले जातात. उन्हाळ्याच्या दिवसांत आंब्यामध्ये असलेले गारवा हा आपल्याला प्रसन्न करण्यास मदत करते. आंबा हा फळांचा राजा आहे . त्याच्यामध्ये असलेले घटक हे आपल्या आरॊग्यास खूप लाभकारी असतात. त्यामुळे वर्षातून एकदा येणाऱ्या आंबा हा आहारातअसला पाहिजे .

कच्या आंब्यापासून नवनवीन पदार्थ बनवले जातात. त्याच्यापासून तयार केलेले लोणचे सुद्धा आपल्या शरीरास पौष्टिक घटक पुरवतात.आंबा हा रसाळ तर आहेच . त्याच्यापासून तयार केलेलं ज्यूस हे सुद्धा खूप गोड आणि थंड असते. आंबा यामध्ये प्रथिने, तंतुमय , जीवनस्त्ववे असे सारे घटक असतात. हे घटक आहारात खूप फायदेशीर असतात. कार्बोहायड्रेट , कॅल्शियम , फॉस्फरस हे सुद्धा जीवनाश्यक घटक जास्त प्रमाणात आंब्यामध्ये असतात. इतर फळांच्या तुलनेत आंबा हा खूप पौष्टिक असतो. त्याच्यामध्ये असलेले सी जीवनस्तव सुद्धा जास्त असतात.

आंबा यामध्ये असलेले घटक आपल्याला अनेक शरीराच्या वेगवेगळ्या समस्यांपासून दूर ठेवण्यास मदत करते . आपल्याला जर हृदयाचा त्रास असेल तर तो त्रास कमी करण्यासाठी आंबा हा लाभकारी आहे . आंबा हा आहारात असल्याने वीर्य वाढण्यास मदत करते . तसेच आपल्याला डोळ्यांच्या आजारापासून दूर ठेवण्याचे काम आंबा करते . आपल्याला रक्तविकारच्या काही समस्या असतील तर त्या दूर करण्यास आंबा मदत करतो.आंब्यामध्ये असलेले सायट्रिक ऍसिड हे आपल्या मुलांना व्हिटॅमिन सी पुरवण्याचे काम करते . कच्या आंबा हा खाण्यात ठेवला गेला पाहिजे .