hot water

गरम पाणी पिल्याने काय होतात शरीरावर दुष्परिणाम

हॅलो आरोग्य ऑनलाईन दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्या आहारात कोमट पाण्याचा समावेश करणे आवश्यक असते. थंडीच्या दिवसांत तर दररोज आहारात कोमट पाण्याचा समावेश केला जावा. त्यामुळे सर्दी , खोकला अशा समस्या निर्माण होणार नाहीत. अनेक जण सांगतात कि गरम पाणी आहारात ठेवले गेले पाहिजे. पण अतिगरम पाणी आहारात ठेवू नये. त्याचे दुष्परिणाम खूप असतात.

— सकाळी उठल्यानंतर सगळे जणशक्यतो गरम पाण्याच्या मदतीनेच अंघोळ करतात. पण अंघोळीसाठी गरम पाणी वापरण्याऐवजी कोमट पाणी वापरले गेले पाहिजे.कोमट पाणीच आरोग्यासाठी महत्वाचे असते. अति गरम पाणी पिल्याने अनेक प्रकारचे दुष्परिणाम जाणवतात.कोणत्या प्रकारच्या दुष्परिणामांचा सामना करावा लागतो. ते जाणून घेऊया …

—- नेहमी लक्षात ठेवावे कि , पाणी पिताना कधी सुद्धा उकळून पाणी पिले जाऊ नये. कारण जास्त प्रमाणात पाणी उकळले तर त्यामुळे पाण्यातील खनिजे हि पूर्णतः निघून जातात. जी आपल्या शरीराला आवश्यक जीवनसत्वे असतात. ती नष्ट होतात. उकळलले पाणी शरीराला अजिबात फायदेशीर नसते.

— जास्त गरम पाण्याने आपल्या शरीरातील अवयवांचे नुकसान होऊ शकते. त्याचा परिणाम हा आपल्या पचनशक्तीवर होतो.

— जास्त प्रमाणात जर गरम पाणी आहारात ठेवले तर मात्र किडनीच्या समस्या या निर्माण होऊ शकतात .

— सतत गरम पाणी पिल्याने आपल्या लघवीच्या ठिकाणी जळजळ होऊ शकते. आणि त्यामुळे उन्हाळे लागू शकतात.